Katrina Kaif : सुनेसाठी ‘ही’ खास डिश बनवते विक्की कौशलची आई | पुढारी

Katrina Kaif : सुनेसाठी 'ही' खास डिश बनवते विक्की कौशलची आई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कॅटरीना कैफची ( Katrina Kaif ) जोडी बी-टाउनमधील चर्चेत असणाऱ्या जोडीपैकी एक आहे. कॅट आणि विक्कीच्या लग्नाला जवळपास दहा महिने उलटले आहेत. याच दरम्यान ‘द कपिल शर्मा’ कॉमेडी शोमध्ये कॅटरीनाने विक्कीच्या परिवारासोबत चांगले बॉन्डिंग असल्याचा खुलासा केला आहे. यात कॅटने सासू तिच्यासाठी एक खास डिश बनवत असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री कॅटरीना कैफने ( Katrina Kaif )  नुकतेच ‘द कपिल शर्मा’ कॉमेडी शोमध्ये पोहोचली आहे. या शोदरम्यान तिला विक्की कौशलच्या घरात तुला कशा प्रकारची वागणूक मिळतेय असे विचारण्यात आलं. यावेळी कॅटने स्वत: विक्की कौशलच्या आई-वडिलांविषयीच्या नात्याचा खुलासा केला आहे. तर कॅटला लग्नानंतर सासू कशी काळजी घेते?, काय खायला देते? सासू-सासऱ्याशी कसे बॉन्डिंग आहे? यासोबत अनेक गोष्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आलं आहे. या प्रश्नाची उत्तरे देताना विक्कीच्या घरच्याशी नात्याचा खुलासा झाला आहे.

पराठे खाण्यास देते

यात फिटनेस फ्रीक कॅटने सांगितले की, विक्कीची आई म्हणजे, माझी सासू वीणा कौशल दररोजच्या जेवणात माझ्यासाठी खास करून रताळे (शकरकन्द) शिजवते. सुरुवातीला सासू मला पराठे खायला द्यायच्या. मात्र, मी डायटवर असल्याने खाऊ शकत नव्हते. परंतु, एक तुकडा खा म्हणायच्या आणि मला आता त्याची सवय झाली. आमच्या लग्नाला जवळपास एक वर्ष झाले असून वीणा कौशल या माझ्यासाठी रताळ्याचे पराटे बनवत असतात. प्रेमाने त्या ही डिश बवनतात आणि सर्वांना खावू देखील घालतात. तर विक्किचे बाबा म्हणजे, माझे सासरे मला प्रेमाने किट्टो’ नावाने हाक मारत असल्याचे कॅटने सांगितले आहे.

Vicky-Kat to keep their wedding private with limited guests - Odisha News In English

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थान येथील सवाई माधोपूर येथे धुमधडाक्यात पार पडला होता. या विवाह सोहळ्याला विक्की- कॅटचे जवळचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. लग्नाआधी दोघेजण एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते.

Vicky Kaushal's love for Katrina Kaif is for 'infinity', see their adorable click from Maldives | Entertainment News,The Indian Express

कॅटरिनाच्या वर्कफंटबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कॅटसोबत बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याशिवाय कॅटरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button