Sonalee Kulkarni : ‘खरी फटाकेबाजी आता होणार…’

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) अभिनय, परीक्षकांसोबत डान्सचा जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे. सोनाली सध्या छोट्या पडद्यावरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात परीक्षक म्हणून चाहत्याच्या भेटीस आली आहे परंतु, हा शो लवकरच संपणार असून याचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. याचे धमाकेदार शुटींगदेखील पार पडले आहे. या शोमध्ये सोनाली एका धमाकेदार गाण्यावर परफॉर्म करणार आहे. याच दरम्यान अप्सराच्या आणखी एक मराठमोळा लूक समोर आला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni )  नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहे. यावेळी तिने गोल्डन-राखाडी रंगाच्या साडीसोबत त्याच रंगाचा ब्लॉऊज परिधान करून चारचॉंद लावले आहेत. केसांची स्टाईल, हातात अंगठी, राखाडी रंगाचे हटके इयररिंग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. यातील खास म्हणजे, सोनालीच्या विथ ब्लॉऊजसोबत इअररिंग्सवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

या फोटोला तिने किलर पोझ दिली असून त्यात तिची वेगळी स्टाईल पाहायाला मिळाली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'दिवाळी अजून बाकी आहे …खरी फटाकेबाजी तर आता होणार…' असे लिहिले आहे. यासोबत तिने आणखी काही फोटो शेअर करत छोट्या पडद्यावरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' शोच्या महाअंतिम सोहळ्या दिसणार असल्याचे सांगितले आहे. तर सोनाली सध्या याच शोमध्ये परिक्षक म्हणूनही काम पाहत आहे. यामुळे सोनालीचा डब्बल धमाका पाहण्यास चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Beautiful ??❤️', 'Stunning ♥️', 'Very beautiful', 'Stunning', 'You are looking soo beauful and gorgeous','looking so good and pretty ?', 'Superb❤️❤️', 'Marathi apsara with her saree swag look ??', 'Plain gorgeous ❤️❤️', '??sona', 'khup khup sundar distes tu' , 'एकदम झकास??',' Gorgeous Sonalee ??', 'Beautiful look and nice red lipstick'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news