Raja Shivchhatrapati : राजधानीत जिवंत होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

Raja Shivchhatrapati : राजधानीत जिवंत होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत 'राजा शिवछत्रपती' (Raja Shivchhatrapati) या हिंदी महानाट्याचे सादरीकरण केले जाईल. यासाठी 'शिवमय' वातावरण निर्मितीसाठी महानाट्य आयोजन समितीकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील विविध भागांमध्ये भगवा ध्वज हाती घेवून हजारो तरुण आपल्या गौरवशाली इतिहासाचे चित्र जिवंत करतील.

ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Raja Shivchhatrapati) इतिहासाची गौरवगाथा मांडत शेकडो युवक १५ फूट भगव्या ध्वज घेवून दिल्लीकरांना महानाट्याला येण्याचे आमंत्रण देतील. आज, शनिवारी सरोजनीनगर मार्केट, लाजपत नगरचे सेंट्रल मार्केट तसेच पालिका बाजारच्या इनर सर्कल, कॅनाट प्लेसमध्ये खास पुण्यावरून आलेल्या ढोल पथकाने आपली कला सादर करीत मराठमोळ्या संस्कृतीची ओळख नागरिकांना करून दिली. २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत हे ढोल पथक दिल्ली तसेच एनसीआरमधील विविध भागात फिरून महानाट्याची प्रसिद्धी करणार आहे.

दरम्यानच्या काळात त्रिनगर मुख्य बाजारपेठ, राणीबाग मुख्य बाजारपेठ, आदर्श नगर, रोहिणी, अजमल खॉ रोड, करोलबाग, ओल्ड राजेंद्र नगर मार्केट, बुराडी, रोहतास नगर, मानसरोवर पार्क, शकरपूर, छतरपुर मेट्रो स्टेशन, पटपडगंज, गुरूकृपा टॉवर, मधु विहार, नोएडा अट्टा, पहाडगंज, बदरपूर, फरीदाबाद,कमला मार्केट, राजौरी गार्डन, तिळकनगर, गुरूग्राम तसेच द्वारका सेक्टर-११ मध्ये ढोल पथकाचे सादरीकरण करीत महानाट्याचे वातावरण निर्मितीचे कार्य केले जाईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.

Raja Shivchhatrapati : जुन्या दिल्लीत अवतरणार छत्रपतींचे सैन्यदल

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सैन्यदल जुन्या दिल्लीत अवतरणार आहे. २ नोव्हेंबरला लाल किल्ला ते चांदणी चौक परिसरात छत्रपतींच्या सैन्यदलाच्या पारंपरिक वेषभूषेत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या सैन्यदलात वापरण्यात येणारे तत्कालीन पारंपरिक वाद्य यंत्र देखील शोभायात्रेची शोभा वाढवेल. यानिमित्ताने छत्रपतींच्या सशक्त सैन्य शक्तीची प्रचिती दिल्लीकरांना येईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news