Asam Drugs caught : तिनियाली येथे 10 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, चौघांना अटक | पुढारी

Asam Drugs caught : तिनियाली येथे 10 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त, चौघांना अटक

पुढारी ऑनलाइन डेस्क : Asam Drugs caught : आसाममधील दिलाय तिनियाली नाका येथून 10 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कारवाई करत चौघांना अटक करण्यात आली.

Asam Drugs caught : एएनआयने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका इनपुटवर कारवाई करत, दिलाय तिनियाली येथे नाका तपासणी करण्यात आली आणि 2 वाहने अडवण्यात आली. ज्यातून पोलिसांनी 10 कोटी रुपये किमतीचे 1. 263 किलो हेरॉईन आणि 75,000 रुपये रोख असलेले 100 साबणाचे मुद्देमाल जप्त केले आणि कारबी आंगलांग जिल्ह्यात 4 ड्रग्ज तस्करांना अटक केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Asam Drugs caught : दोन आठवड्यांपूर्वी, अमित शाह यांच्या उपस्थितीत ईशान्येकडील राज्यांनी गुवाहाटीमध्ये 40,000 हजार किलो किमतीचे ड्रग्स आणि अंमली पदार्थ नष्ट केले होते.

गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने किमान 75,000 किलो जप्त केलेले मादक पदार्थ नष्ट करण्यासाठी 75 दिवसांसाठी एक विशेष मिशन तयार केले. हे उद्दिष्ट ६० दिवसांच्या आत पूर्ण झाले. आतापर्यंत एक लाख किलोहून अधिक ड्रग्ज आणि अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.

Asam Drugs caught : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या गांधीनगरच्या ड्रग ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी या विषयावरील प्रादेशिक बैठकीला संबोधित केले. या परिषदेत वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button