UN Report : गेल्या 15 वर्षात भारतात 41 कोटी लोक गरिबीतून बाहेर | पुढारी

UN Report : गेल्या 15 वर्षात भारतात 41 कोटी लोक गरिबीतून बाहेर

पुढारी ऑनलाइन डेस्क : UN Report : यूएनच्या एका अहवालानुसार, भारतात 2005-6 ते 2019-21 या कालावधीत 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहे. यूएन अनुसार हा एक ऐतिहासिक बदल असून विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण केस स्टडी आहे. इतकेच नव्हे तर विकासात सातत्य ठेवल्यास 2030 पर्यंत गरिबी निम्म्यापेक्षा जास्त कमी करू शकतो.

UN Report : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातील ऑक्सफोर्ड गरिबी विभाग आणि मानव विकास पहल यांनी संयुक्त रित्या हा अहवाल जारी केला आहे. बहुआयामी गरिबी सूचकांक असे या अहवालाचे नाव आहे. यामध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे.

युएनकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की 15 वर्षात 41.5 कोटी लोक गरिबीच्या चक्रव्यूहातून बाहेर येणे हा निश्चितच ऐतिहासिक बदल आहे. तसेच हा बदल सतत विकासाच्या लक्ष्यासाठी एक महत्वपूर्ण केस स्टडी आहे. सर्व प्रकारची गरिबी हटवणे आणि कोणत्याही प्रकारच्या गरिबीत राहणा-या सर्व वयाचे स्त्री-पुरूष, मुलं-मुली यांना गरिबीतून बाहेर काढून 2030 पर्यंत निम्म्यावर ही संख्या आणण्याचे लक्ष्य एका मिसाल प्रमाणे आहे.

UN Report : भारताने जरी एक मोठा टप्पा गाठला असला तरी अहवालात या गोष्टीकडे देखिल लक्ष वेधले गेले आहे की जगभरातील देशांमध्ये गरीबांची संख्या सर्वात जास्त भारतात आहे. 2020 च्या जनगणनेच्या आधारावर 22.89 कोटी इतकी आहे. त्यानंतर नायजेरियाचा नंबर येतो. तिथे 9.67 कोटी लोक गरिब आहेत.

कोविड 19 महामारी, खाद्य आणि उर्जा क्षेत्रातील वाढलेल्या किंमती यामुळे प्रगतीकरूनही जनता प्रभावित झाली आहे. भारतासमोर कुपोषण आणि उर्जा संकट ही मोठी आव्हाने असून हे आव्हान पेलण्यासाठी एकीकृत नितींना प्राधान्य द्यायला हवे, असे म्हटले आहे.
अहवालानुसार भारतात 2019-21 मध्ये 9.7 कोटी मुलं वैश्विक एमपीआयमध्ये जगातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की 111 देशातील 1.2 अब्ज लोक 19.1 टक्के भीषण बहुआयामी गरिबीशी लढत आहे. आणि यापैकी निम्मे लोक म्हणजे 59 कोटीपेक्षा जास्त लोक 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत.

हे ही वाचा:

Digital Banking Units : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सचे राष्ट्रार्पण

 

Back to top button