नाशिक : शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार, लाच घेतल्याचा आरोप

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक संस्थाचालकांकडून ८ लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री महिलेस अटक करता येत नाही यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झनकर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत डॉ. झनकर यांना घरी सोडले होते.
मात्र त्या हजर न झाल्याने त्या पसार झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. वैशाली झनकर यांनी विभागास गुंगारा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
- Food Update : केंद्र सरकारचा मोठा निर्णय देशभरात डाळींच्या साठयांवर निर्बंधॉ
- Kisan credit card scheme : शेतकऱ्यांसाठीची ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’ योजना तुम्हाला माहिती आहे का?
सापळा रचुन पकडले पण
जिल्हा परिषदेत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर एस. येवले यास तक्रारदाराकडून आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर – झनकर यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्विकारल्याची कबुली विभागाकडे दिली.
- WTC Points ही गेले, दंडही लागला; टीम इंडियाला मोठा धक्का
- इचलकरंजी : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी डॉक्टरवर कारवाई
तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरु करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात झनकर यांनी प्राथमिक शिक्षक पंकज आर. दशपूते यांच्या मार्फत तक्रारदारांकडे ९ लाख रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदारांनी याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी सुरुवातीस चालकास पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
- बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांसह कुत्रा ठार
- राजगुरूनगर : दारूड्या वडिलांचा १६ वर्षाच्या मुलाने केला खून
त्यानंतर शिक्षक दशपूते याला पकडले व झनकर यांना ताब्यात घेतले. तिघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, येवले व दशपूते यांना अटक करण्यात आली, तर सायंकाळी महिलेस अटक करता येत नसल्याने झनकर यांना त्यांच्या दोन नातलगांचे हमीपत्र लिहून घेत घरी सोडण्यात आले. झनकर यांना सकाळी पोलिस ठाण्यात हजर होणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी गुंगारा दिल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, लाचखोर प्रकरणात अटक केलेल्या येवले व दशपूते यांना न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.