सोलापूर : पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार | पुढारी

सोलापूर : पतीच्या संमतीनेच केला मित्राने पत्नीवर बलात्कार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच पतीच्या संमतीनेच सोलापूर येथे त्याच्या मित्राने विवाहितेवर घरात घुसून बलात्कार केला. याप्रकरणी पती व त्याचा मित्र अक्षय राजकुमार गवसाने (रा. सात रस्ता) या दोघाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

संबंधित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे, विवाहितेच्या पतीचा Rapeअक्षय गवसाने हा मित्र आहे. त्याने ओळखीतून त्या विवाहितेला हॉस्पिटलमध्ये चांगली नोकरी लावतो असे आमिष दाखविले. त्यातून मार्च 2021 पासून ओळख वाढविली. त्याने विवाहितेचा मोबाईल क्रमांकही घेतला. तेव्हापासून तो त्या विवाहितेला व्हॉटस् अ‍ॅपवर चाटिंग करू लागला. परंतु, तिने त्याला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, पतीच्या सांगण्यावरून 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पतीसमवेत अक्षय हा विवाहितेच्या घरी आला. तेव्हा तिने पतीला याबाबत विचारले. त्यावेळी पतीने अक्षय व तो त्यांच्या घराच्या टेरेसवर झोपतो असे सांगितले. त्यानुसार ते दोघे टेरेसवर झोपण्यास गेले. त्यानंतर काही कालावधीनंतर अक्षय हा घराचा दरवाजा ढकलून पुन्हा आत आला.

त्यावेळी त्या विवाहितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. पण तिने आरडा-ओरड करू नये म्हणून अक्षयने हाताने तिचे तोेंंड दाबून तिला ओढत बेडरूममध्ये नेले. तेथे ‘तुझ्या पतीनेच मला तुझ्याजवळ झोपण्यास सांगितले आहे’ असे त्याने तिला सांगितले.

‘तुझा पती नामर्द आहे, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे असे सांगत त्याने तिला पतीसोबतचे अश्लिल फोटो दाखविले. आरडाओरड केली तर तुझ्या पतीची व तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. तिने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानुसार तिने याप्रकरणी पोलिस ठाण्यात पती व अक्षय गवसाने या दोघांविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास फौजदार मस्के हे करीत आहेत.

Back to top button