इचलकरंजी : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी डॉक्टरवर कारवाई | पुढारी

इचलकरंजी : गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी डॉक्टरवर कारवाई

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरात गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी आज एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली.  जिल्हा पोलिसांकडे गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची तक्रार दाखल झाली होती. या रुग्णालयावर दुसऱ्यांदा गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे.

पोलिसांनी याबाबत शहानिशा करत सापळा रचत काटकर हॉस्पिटलवर कारवाई केली. या घटनेने इचलकरंजी परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

शहरातील विकली मार्केट शेजारील काटकर हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती.

याबाबत पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे सदरचा गैरप्रकार उघडकीस आणला.

या प्रकरणी जिल्हा पोलिस दलाकडे काटकर हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्याची तक्रार आली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसूतिपूर्व काटकर या खासगी रुग्णालयात बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याची तक्रार निर्भया पथकाकडे केली होती. याचा छडा लावण्यासाठी एका जोडप्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

या हॉस्पिटलवर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांसह आरोग्य विभागाचे पथक रुग्णालयात दाखल झाले आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे तज्ज्ञांनी कारवाई केली.

हेही वाचलं का? 

Back to top button