बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांसह कुत्रा ठार | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांसह कुत्रा ठार

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्‍या हल्ल्यात दाेन शेळ्यांसह एक कुत्रा ठार झाला. बिबट्याच्‍या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाल्‍याची  घटना बुधवारी ( दि. ११ ) सकाळी सहा वाजता घडली. यामुळे वळती ग्रामस्‍थांमध्‍ये घबराट पसरली आहे.

अधिक वाचा – 

याबाबत सविस्तर माहिती अशी – वळती ते भागडी रस्त्यावर अर्जुन मारूती गाढवे यांचे शेळ्यांचे शेड आहे. त्यांचा  शेळीपालनाचा व्यवसाय आहे. घराच्या मागे बांधलेल्या शेडमध्ये १५ शेळ्या व काही कोंबड्या आहेत.

अधिक वाचा – 

बिबट्याने कुत्र्याचा पाडला फडशा 

शेडच्या उत्तर दिशेला बाजूला मका व उसाचे शेत आहे. बिबट्याने पहाटे मक्याच्या शेतातून येऊन शेडमध्ये प्रवेश केला. तेथे बांधलेल्या कुत्र्याचा फडशा पाडला. त्यानंतर शेळ्यांच्या शेडमधील दोन शेळ्या जागीच ठार केल्या. त्यापैकी एक शेळी गाभण होती.

त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अर्जुन गाढवे व त्यांच्या पत्नी शेडमधील शेळ्या बाहेर काढण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना बिबट्या शेडमध्ये दिसला.ताे शेडमधून बाहेर पडण्यासाठी सैरभैर पळू लागला. नंतर त्याने पाच फुटी उंचीच्या तारेच्या कंपाउंडवरून उडी मारून मक्याच्या शेतात त्‍याने धूम ठोकली .

वनपरिक्षेत्रधिकारी अजित शिंदे, वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस .एस. दहातोंडे, एम. बी. मुंडकर, संपत भोर, शरद जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला . या घटनेमुळे वळती, शिंगवे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचलंत का? 

Back to top button