सोमय्यांकडून राऊतांवर मानहानीचा खटला दाखल | पुढारी

सोमय्यांकडून राऊतांवर मानहानीचा खटला दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉयलेट घोटाळ्याचे आरोप करत, राऊतांकडून माझी वारंवार बदनामी करण्यात येत आहे. संजय राऊतांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप केलेत. राऊतांच्या या खोट्या आरोपामुळे माझी बदनामी झाली आहे. असे सांगत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी शिवडी न्यायालयात राऊतांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत  यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे, प्रत्यक्षात संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता.

गेले कित्येक दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या दोघांमधील हा वाद आता कोर्टात पोहचला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सोमय्यांनी टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाचा छळ आणि बदनामी केली असल्याचा आरोप करत, किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button