सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : पुढारी वृत्तसेवा नायगाव, ता. खंडाळा येथे गेल्या 8 महिन्यांपासून स्वमालकीच्या जागेत एकजण बेकायदा उत्खनन करत असून तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याच्या कारणावरुन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय नेवसे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नायगाव येथे स्वमालकीच्या जमिनीमध्ये बेकायदा उत्खनन सुरू आहे. याबाबत खंडाळा तहसिलदार, प्रांताधिकारी व नायगाव तलाठी यांच्याकडे संजय गोपाळ नेवसे यांनी तक्रारी केल्या होत्या.

तलाठी मनिष शिंदे यांनी सुरू असलेल्या उत्खननाबाबतचा खोटा पंचनामा करून तहसिलदारांकडे पाठवला. मात्र त्यावर महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नेवसे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी दुपारी संजय नेवसे हे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी अग्नीशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी नेवसे यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी नेवसे यांना ताब्यात घेवून आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यास संजय नेवसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button