ऑस्कर पुरस्कार 2022 : विल स्मिथचा ऑस्कर रद्द होण्याची शक्यता? अकादमीचा नियम काय आहे? | पुढारी

ऑस्कर पुरस्कार 2022 : विल स्मिथचा ऑस्कर रद्द होण्याची शक्यता? अकादमीचा नियम काय आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क :

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज पार पडला. मात्र या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार विजेता अभिनेता विल स्मिथने कार्यक्रमाचे सूत्रसंचालक क्रिस रॉकच्‍या कानशिलात लगावली.  याचे वृत्त आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर विल स्मिथकडून त्याचा ऑस्कर काढून घेतला जाऊ शकतो, अशा चर्चेला उधाण आले आहे.

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता.  निवेदक क्रिस रॉकला लावलेल्या कानाखालीमुळे या सोहळ्यातील वातावरण तापले आहे. या घटनेमुळे स्मिथच्या इतक्या वर्ष घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी फिरणार की काय?अशी भीती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. कित्येक वर्षाच्या अथक मेहनतीनंतर यंदा हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा ऑस्कर पुरस्कार स्मिथला मिळाला होता. न्यूयॉर्कमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विल स्मिथला त्याचा ऑस्कर परत द्यावा लागणार असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर अकादमीनेही यावर स्पष्टीकरणही दिले आहे.

नेमकं काय घडलं ?

क्रिस रॉक सर्वोच्च पुरस्काराचे निवेदन करण्यासाठी मंचावर आला. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या हेअरस्‍टाईलची खिल्ली उडवली. यावर नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली. हे दृश्य बघितल्यावर सुरूवातीला वाटले हा शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे; पण नंतर काही व्हिडीओ समोर ज्यामध्ये विलही रडताना दिसत होता.

असा आहे अकादमीचा नियम ?

ऑस्कर पुरस्कार हा अमेरिकेतील ‘The Academy of Motion Picture Arts and Sciences ’ या संस्थेतर्फे दिला जातो. अकादमीने ट्विट करत आज पुरस्‍कार वितरण साेहळ्यात घडलेल्‍या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. अकादमीने आपल्या ट्विटरवर  म्हटलं आहे की, “ही अकादमी कोणत्याही स्वरूपाची हिंसा माफ करत नाही.” या ट्वीटमुळे स्मिथच्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Back to top button