Kitchen Tips : किचन स्‍वच्‍छ ठेवायचंय, तर ‘या’ टीप्‍स तुमच्‍यासाठी… | पुढारी

Kitchen Tips : किचन स्‍वच्‍छ ठेवायचंय, तर 'या' टीप्‍स तुमच्‍यासाठी...

शेफ वरुण इनामदार : स्वयंपाक (Kitchen Tips ) करणे हे काही केवळ अन्न शिजविण्याचे, खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम नाही, तर आपल्याला मानसिक शांती मिळवून देणारे, मनावरील तणाव दूर करणारे, उपचारात्मक स्वरुपाचे ते काम आहे. तसा बऱ्याच जणांचा अनुभवही आहे. वेगवेगळ्या पाककृतींची कल्पना करून त्या प्रत्यक्ष करून बघायच्या आणि दिवस अखेरीस त्यांचा स्वाद घेऊन स्वतःची कौतुक करून घ्यायचे हा अनुभव खरोखरच विस्मयकारक असतो.

स्वयंपाक करीत असताना एक प्रकारचा उत्‍साह येत असतो, आपल्या मनोवृत्ती बहरत असतात. त्यातून खूप मोठा आनंद मिळत असतो. असे असतानाही, स्वयंपाक करून झाल्यावर पुन्हा स्वयंपाकघरात (Kitchen Tips ) जायचे म्हटलं, तर कितीजण उत्साहाने तयार होतील? मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्वयंपाकाच्या संपूर्ण प्रक्रियेत, स्वयंपाक करून झाल्यानंतर आवराआवर करणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते; परंतु हेही खरे, की कितीही प्रयत्न केला, तरी स्वयंपाकाच्या परिपूर्ण अनुभवानंतर स्वयंपाकघरातला पसारा आपण तसाच सोडून देऊ शकत नाही. आपण ज्या पद्धतीने स्वयंपाकघराची देखभाल करतो त्यावरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा होत असते. मात्र याचा अर्थ असा नव्हे, की स्वयंपाक झाल्यावर लगेचच आपण स्वयंपाकघर आवरायला सुरुवात करावी आणि त्या काळात आपले कुटुंबिय किंवा मित्रमंडळी जेवण वाढले जाण्याची वाट पाहात ताटकळत राहावेत. आवराआवरीचे काम नंतरही  केले जाऊ शकते. फक्त ते करण्याची पद्धत व्यवस्थित असायला हवी. त्याचे अनेक मार्ग आहेत. या मार्गांचे तपशील येथे मांडणे अप्रस्तुत ठरेल. तरीही, मी स्वतः माझे स्वयंपाकघर नेहमी कसे स्वच्छ ठेवतो, याच्या काही टिप्स येथे देतो…

फरशी स्वच्छ पुसा www.pudhari.news
फरशी स्वच्छ पुसा

१. Kitchen Tips -फरशी स्वच्छ पुसा

 बेकिंगमध्ये वापरण्याव्यतिरिक्त बेकिंग सोडा हा एक उत्कृष्ट डिओडोरायझर आणि क्लिनर असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हिनेगरमध्ये मिसळल्यास हा सोडा ग्रीसचे डाग पुसण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. या मिश्रणामुळे एक शक्तिशाली आम्ल-आधारित अभिक्रिया निर्माण होते. फरशी स्वच्छ करण्यासाठी आपल्या मॉपच्या पाण्यात हे मिश्रण घाला आणि फरशी घासून घ्या. त्याचे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

२. लिंबाच्‍या रसाचा वापर करा

स्वयंपाकघरात प्रवेश करताच एक गोष्ट स्पष्टपणे दिसते ती म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील भिंत. या भिंती अनेकदा डागाळलेल्या आणि अस्वच्छ असतात. विशेषत: तुमच्या शेगडीच्या मागे आणि वरच्या बाजूला अन्नाचे शिंतोडे उडालेले सहज दिसतात. थोडे कोमट पाणी घ्या, त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि टाईल्स घासून घ्या. लिंबू पाणी आणि व्हिनेगरसह घासल्यास ते डाग त्वरित निघून जातात. हे मिश्रण एक शक्तिशाली डीग्रीसर म्हणूनदेखील कार्य करते. आपल्या स्वयंपाकघराला एक लिंबाचा ताजा वास ते देते आणि तेथील पृष्ठभाग आणि भिंतींना टवटवीत करते.

Kitchen Tips

३. स्वयंपाकघरातील उपकरणे स्वच्छ ठेवा

तंत्रज्ञानामुळे आपले सर्व जीवन निश्चितच सोपे झाले आहे. आपल्या हातात कितीही वेळ असला तरीही, आपली स्वयंपाकघरातील उपकरणे संपूर्ण स्वयंपाकाच्या अवधीत आपल्याला उत्कृष्ट अनुभव देतात. आणि स्वयंपाक अधिक चांगला बनवतात. अर्थात ही उपकरणे आपले जीवन सोपे करण्यासाठी असली, तरी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचा रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, कॉफी मेकर, मिक्सर-ग्राइंडर, ओव्हन इ.  सर्व उपकरणे तुमचे अन्न साठवतात, शिजवतात, त्यांचे मिश्रण करतात आणि त्यामुळे त्या सर्वांमध्ये या अन्नपदार्थांचा वास येत राहतो, चव येत राहते. तुम्ही दोन दिवसांपूर्वी शिजवलेल्या पदार्थाची चव आणि वासही त्यांत येऊ शकतो. म्हणूनच ही उपकरणे चांगल्या प्रकारे स्वच्छ करणे आणि नियमितपणे दुर्गंधीमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचे मिश्रण तुमची उपकरणे खोलवर स्वच्छ करण्यासाठी खूप चांगले कार्य करते. तुमची स्टीलची आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने ती घासा. (Kitchen Tips)

४. कीटकांना हाकला

 स्वयंपाक करताना तुमच्या स्वयंपाकघरात थोडी सांडांसाडी होईल, हे समजण्यासारखे असले, तरी त्यामुळे झुरळे आकर्षित होतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. झुरळे गलिच्छ ठिकाणी फिरतात आणि नंतर ती आपले अन्न दूषितही करू शकतात. त्यामुळे  आपल्याला काही आजारही होऊ शकतात. स्वयंपाक केल्यावर लगेच स्वयंपाकघर साफ करणे कठीण असते; परंतु तुम्ही हे आगंतुक पाहुणे अन्नाच्या वासाने आमंत्रित होणार नाहीत, याची खातरजमा करून घेत चला. स्वयंपाक  केल्यानंतर झुरळ मारणारा हिट स्प्रे किंवा एंटी रोच जेल सारख्या उत्पादन नियमितपणे वापरा. ही उत्पादने लपलेल्या झुरळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो त्याचा ‘डीप रीच नोझल’ लपलेल्या झुरळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो. स्वयंपाकघरातील झुरळांकडे लक्ष न देता तुम्ही तिथे अन्न तसेच ठेवू शकणार नाही, खरे ना?

अत्यावश्यक वस्तू धुवून ठेवा www.pudhari.news
अत्यावश्यक वस्तू धुवून ठेवा

५. अत्यावश्यक वस्तू धुवून ठेवा

 स्वयंपाकघराची स्वच्छता व आवराआवर या गोष्टी जेवण झाल्यावर करू, असे तुम्ही ठरविले असेल, तर ते चालण्यासारखे आहे; परंतु तीन गोष्टींचा विचार मात्र लगेचच केला पाहिजे. सुऱ्या, गाळणी आणि खिसणी या गोष्टी नंतर स्वच्छ करू असे तुम्ही म्हणालात, तर ते काम खूप अवघड आणि वेळखाऊ असते. गाळणी व खिसणी तशीच ठेवली, तर त्यांमध्ये अडकलेले, वाळलेले अन्न काढून टाकण्यात फार वेळ जातो. त्यामुळे ही तीन उपकरणे त्वरीत धुवून टाकणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.

चला तर मग.. पुढे या आणि तुम्ही नेहमी स्वप्नात पाहत असलेले ओपन किचन स्वतःच मिळवा!

Back to top button