Ukrainian Prisoners : रशियाविरोधात युक्रेन उतरविणार तुरुंगातील कैद्यांना : झेलेन्स्कींची घोषणा | पुढारी

Ukrainian Prisoners : रशियाविरोधात युक्रेन उतरविणार तुरुंगातील कैद्यांना : झेलेन्स्कींची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये चौफेर घुसखाेरी करत रशिया हल्ले करत आहे. तरीही युक्रेन मोठ्या शर्थीने याचा सामना करत आहे. युरोपीय संघाकडून युक्रेनला मदत पोहोचवली जात आहे. आतापर्यंत ४३०० रशियन सैनिकांचा मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे, तर २०० पेक्षा जास्त जणांना युद्धकैदी बनविण्यात आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशियाच्या विरोधात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना आपल्या देशातील कैद्यांना (Ukrainian Prisoners) बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना नुकतंच सांगितलं आहे की, “जे रशियाच्या विरोधात लढण्यास इच्छुक आहेत आणि तसेच लष्कराचा अनुभव असलेल्या कैद्यांची (Ukrainian Prisoners) सुटका केली जाणार आहे”, असे वृत्त रायटर वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे की, आतापर्यंत सुमारे ३७६ लोकांना रशिया आणि युक्रेनच्या युद्धांचे परिणाम भोगावे लागले आहेत. त्यात ९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतीय राजदूत इगोर पोलिखा यांना पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, बाॅम्बस्फोट आणि गोळीबारात १६ मुलांचा मृत्यू झाला आहे. .

झेलेन्स्कींच्या हत्येचा रशियाचा प्लॅन फसला

युक्रेनने रशियाला जबरदस्त धक्का दिला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची मोठी तुकडी पाठवलेली होती. मात्र, युक्रेनने या संपूर्ण फोर्सचाच खात्मा केला आहे, असं वृत्त डेली मेलने दिलं आहे.

बर्बर चेचेन स्पेशल फोर्सची तुकडी ही खूप क्रूर आणि हिंसाचारी आहे. त्याचबरोबर मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी कुप्रसिद्ध आहे. कीव्हच्या ईशान्यकडील हाॅस्टोमेलजवळ त्याच्या ५६ रणगाड्यांचा ताफा युक्रेनच्या क्षेपणास्त्राने उडविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी या फोर्समधील किती सैनिक मारले गेले, याची माहिती समोर आलेली नाही;परंतु संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये चेचन जनरल मॅगोमेद तुशैव यांचंही नाव असल्याचे समोर आले आहे. तुशैवला फोटोमध्ये कादिरोवसोबत दाखविण्यात आलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण, कादिरोव समलिंगी पुरुषांचा छळ करून त्यांना मारण्याच्या कामात प्रसिद्ध आहे. कादिरोवने त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी युक्रेनियच्या जंगलात स्क्वाड्रनला भेट दिली होती, असं सांगितलं जातं.

व्हिडीओ पाहा : युक्रेन एकाकी | Pudhari Podcast

Back to top button