रशिया- युक्रेन युद्धाचा फटका; गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार?

रशिया- युक्रेन युद्धाचा फटका; गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार?
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानच्या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ अटळ मानली जात असून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सबसिडीच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर एक हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल केले जातात, त्यानुसार मंगळवारी 1 मार्च रोजी गॅस सिलिंडर दरात वाढ केली जाण्याचे संकेत आहेत. गेल्या जानेवारी महिन्यापासून इंधन दरात वाढ सुरु आहे. मात्र तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर स्थिर ठेवलेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे प्रतिबॅरलचे दर शंभर डॉलर्सवर पोहोचले आहेत. येत्या महिनाभरात हे दर 115 डॉलर्सवर जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याचमुळे विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल, सबसिडीचा व गैरसबसिडीचा गॅस, एलएनजी, सीएनजी वायू यांची मोठी दरवाढ झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.

गतवर्षीच्या 6 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडर दरात वाढ करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे 7 मार्चनंतर कधीही गॅस सिलिंडरचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढविले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मधल्या काळात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात वाढ झाली होती. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हे दर 170 रुपयांनी वाढविण्यात आले होते. सबसिडीच्या गॅस सिलिंडर दराचा विचार केला तर दिल्ली- मुंबईत हे दर 900 रुपये इतके आहेत. 7 मार्चनंतर हेच दर हजार रुपयांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : युक्रेन एकाकी | Pudhari Podcast

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news