Finance Minister : रशिया-युक्रेन युध्दाचे भारतावर हाेणार्‍या परिणामाबाबत केंद्रीय अर्थमंत्री म्‍हणाल्‍या…

File photo
File photo

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
रशिया-युक्रेन युध्दाचा आज पाचवा दिवस आहे. या दोन्‍ही देशांमधील संघर्ष अधिक चिघळत चालला आहे. या युध्दामुळे भारतावर होणार्‍या परिणामाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ( Finance Minister) चिंता व्‍यक्‍त केली आहे. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, " आम्‍ही या मुद्‍याचा गांभीर्याने विचार करत आहोत. आयात विधेयकावरही आम्‍ही विचार करत आहोत "

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्‍हणाल्‍या, " युध्दामुळे भारताचे युक्रेनसोबत असणार्‍या व्‍यापार संबंधावर परिणाम होणार आहेत. विशेषत: कृषी क्षेत्रातून युक्रेनला होणार्‍या निर्यातीवर याचा परिणाम होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Finance Minister : कृषी क्षेत्रातून होणार्‍या निर्यातीवर परिणाम होणार

युक्रेनवरील परिस्‍थितीवर आम्‍ही लक्ष ठेवून आहोत. युध्दामुळे तत्‍काळ परिणाम हा आयात व निर्यातीवर होणार आहे. यावर आम्‍ही तीव्र चिंतेत आहोत. भारतातील खाद्‍य तेलासह अन्‍य क्षेत्रांवर याचा दुष्‍परिणाम होणार आहे. कृषी क्षेत्रातून रशिया आणि युक्रेन यांना होणार्‍या निर्यातीवर याचा परिणाम होणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

केंद्र सरकार विविध समस्‍यांचा सामना करत आहे. त्‍यामुळे सर्वच संबंधित मंत्रालयांच्‍या माध्‍यमातून मूल्‍यमापन करावे लागले. यानंतर याबाबत बोलता येईल. मात्र या युद्‍धामुळे आवश्‍यक वस्‍तुंवर निश्‍चित पडणार आहे. त्‍यामुळे आयात विधेयकावरही आम्‍ही विचार करत आहोत, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी स्‍पष्‍ट केले.

कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमती भडकल्‍या

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेन विरु्‍दध युध्दाची घोषणा केली. या निर्णयाचा निषेध करत पाश्‍चात्‍य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लावले आहेत. यामुळे कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमतीने मागील आठ वर्षांतील उच्‍चांक गाठला आहे. याचा
नकारात्‍मक परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news