सर्वपक्षीय बैठक : मोदींच्या ‘त्या’ बैठकीला काॅंग्रेस, शिरोमणी अकाली दलाचा बहिष्कार | पुढारी

सर्वपक्षीय बैठक : मोदींच्या 'त्या' बैठकीला काॅंग्रेस, शिरोमणी अकाली दलाचा बहिष्कार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोनाची स्थिती आणि कोरोना लसीकरण कार्यक्रमासंबंधी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केलेली होती. त्यामध्ये शिरोमणी अकाली दल आणि काॅंग्रेसने बहिष्कार टाकण्याची घोषणा केलेली आहे.

काॅंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “आम्ही या संदर्भात सांगितले होते की, सर्व खासदारांना फ्लोर लिडर्सशिवाय सेंट्रल हाॅलमध्ये बोलविण्यात यावं. कारण, सर्वांशी चर्चा झाली पाहिजे.”

“आम्ही हेही सांगितलं होतं की, दोन भागात ही चर्चा व्हायलाी हवी. त्यामुळे आम्ही या बैठकीत सहभागी होत नाही. कारण, कोरोना संदर्भातील माहिती ही सर्वांना माहीत व्हायला पाहिजे.” असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप सरकारने कोणती सर्वपक्षीय बैठक बोलवली नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.”

“गरीब शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. आणि सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आम्ही या बैठकीत सहभागी होणार नाही”, असे स्पष्टीकरण सुखबीर सिंह बादल यांनी दिले. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकात काॅंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचा सहभाग असणार नाही.

व्हिडीओ पहा : नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले? 

हे वाचलंत का?

Back to top button