नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी दिला होता लव्ह मेकिंग सीन | पुढारी

नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी दिला होता लव्ह मेकिंग सीन

पुढारी ऑनलाईन डेस्क : नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी लव्ह मेकिंग सीन दिला होता. नसीरूद्दीन शाह आणि विद्या बालन यांचा ‘डर्टी पिक्चर’ चित्रपट चांगलाचं गाजला. वयाच्या ६१ व्या वर्षीही तरुण अभिनेत्रीसोबत लव्ह मेकिंग सीन देणारे नसरूद्दीन यांची गोष्टचं वेगळी!

अधिक वाचा –

या चित्रपटात विद्या बालनसोबत बोल्ड आणि जबरदस्त किसींग सीन देऊन नसीरुद्दीन शाह यांनी धुमाकूळ घातला. त्यावेळीही ते नेहमीप्रमाणे पुन्हा चर्चेत आले. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, ‘डर्टी पिक्चर’चं नव्हे तर ‘सात खून माफ,’ ‘बेगम जान’ आणि ‘डेढ इश्किया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी लव्‍ह मेकिंग सीन्स दिले आहेत.

आज २० जुलैला नसीरुद्दीन शाह यांचा ७० वा वाढदिवस आहे.

अधिक वाचा –

एकापेक्षा एक वेगळ्या धाटणीच्या चित्रपटामध्ये त्यांनी चित्रपट स्क्रिप्टची गरज म्हणून कुठलीही तमा न बाळगता बिनधास्त बोल्ड सीन्स दिले आहेत. रोमँटिक हिरोच्या भूमिकेबरोबरचं त्यांनी ‘सरफरोश,’ ‘मोहरा’ आणि ‘कृष’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही अगदी सहजपणे साकारली आहे.

बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी उतरत्या वयातदेखील ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘इश्किया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले. या सर्व भूमिकेत नसीरुद्दीन शाह एकदम फिट बसले.

बोल्‍ड सीन्‍सने धुमाकूळ 

नसीरुद्दीन यांनी अनेक चित्रपटांमध्‍ये बोल्‍ड सीन्‍स दिले आहेत. ‘डर्टी पिक्चर,’ ‘सात खून माफ,’ ‘बेगम जान’ आणि ‘डेढ इश्किया’ या चित्रपटात लव्‍ह मेकिंग सीन दिले आहेत.

नसीरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी चित्रपटांतही काम केलं आहे. त्‍यांनी शोएब मनसूर यांचा ‘खुदा के लिए’ या पाकिस्‍तानी चित्रपटात काम केलं होतं. तसेच त्‍यांनी हॉलिवूडपटातही काम केलं आहे. ‘द लीग ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी जेंटलमॅन’ या चित्रपटात महत्त्‍वाची भूमिका साकारली होती.

खूप कमी लोकांना माहिती आहे की नसीरुद्दीन शाह उत्तर प्रदेशातील बाराबंकीचे राहणारे आहेत. त्‍यांचे वडील लष्‍कर अधिकारी होते तर आई गृहिणी होत्या.

निशांतमधून प्रकाशझोतात

नसीरुद्दीन यांनी आपल्‍या चित्रपट करिअरची सुरूवात श्याम बेनेगल यांचा १९७५ मध्‍ये आलेला चित्रपट ‘निशांत’मधून केली होती. या चित्रपटात त्‍यांची छोटी भूमिका होती. परंतु, या एका छोट्‍या भूमिकेमुळे ते लाईमलाईटमध्‍ये आले.

असं म्‍हटलं जातं की, नसीरुद्दीन शाह यांनी १८ वर्षांचे असताना राज कपूर आणि हेमा मालिनी यांचा चित्रपट ‘सपनों के सौदागर’मध्‍ये काम केलं होतं. पण, त्‍यांचा या चित्रपटातील सीन हटवण्‍यात आला होता.

त्यांनी बॉलिवूडमध्‍ये १९८० मध्‍ये आलेला चित्रपट ‘हम पांच’मधून काम करण्‍यास सुरूवात केली. नसीरुद्दीन यांनी १४ वर्षांचे असताना अभिनय सुरू केला होता.

नसीरुद्दीन यांचं पहिलं नाटक ‘मर्चेंट ऑफ वेनिस’ होतं. ज्‍यात त्‍यांनी आपल्‍या दोन शाळेच्‍या मित्रांसोबत मिळून काम केलं होतं.

अधिक वाचा – 

विविध पुरस्कारांचे मानकरी

हिंदी सिनेमातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या करिअरमध्ये त्यांनी ‘निशांत,’ ‘आक्रोश,’ ‘स्पर्श,’ ‘मिर्च मसाला,’ ‘एलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है,’ ‘त्रिकाल,’ ‘जुनून,’ ‘मंडी,’ ‘अर्ध सत्य,’ ‘कथा,’ ‘जाने भी दो यारो’, ‘चमत्कार’ यांसारखे चित्रपट केले.

१९८२ मध्ये त्यांनी चित्रपट ‘दिल आखिर दिल है’मध्ये काम केलं. त्यामध्ये अभिनेत्री राखी यांची भूमिका होती.

त्यानंतर, १९८३ मध्ये ‘मासूम,’ १९८६ मध्ये ‘कर्म’मध्ये तसेच ‘गुलामी,’ ‘त्रिदेव,’ ‘विश्वात्मा,’ ‘मोहरा’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

तब्बल १५ वर्षांनी मोठ्या तरुणीशी लग्न

शाह यांना कमी वयात प्रेम झालं होतं. त्यावेळी ते २० वर्षांचे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मनारा सीकरी नावाच्या मुलीशी प्रेम झालं.

मनारा ह्या शाह यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठ्या होत्या. शाह २० वर्षांचे तर मनारा ३६ वर्षांची होती. दोघांमध्ये वयातील अंतर अधिक असतानाही त्यांनी लग्न केले.

दोघांना एक मुलगी झाली, तिचे नाव हीबा शाह असं ठेवण्यात आलं. शाह यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, त्यांचा लग्नाचा निर्णय चुकीचा होता.

हीबा शाहच्या जन्मानंतर मनारा यांच्यापासून ते वेगळे झाले.

इतकेच नाही तर आपल्या ६ महिन्याच्या मुलीपासून वेगळे झाले. पुढे शाह ८ वर्षे आपल्या मुलीला भेटले नाही. १९८२ मध्ये मनारा यांचे निधन झाले.

naseeruddin shah
वयाची साठी पार केलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी तरुण अभिनेत्रीसोबत दिले बोल्ड सीन्स

रत्ना पाठक दुसरी पत्नी

शाह आणि ओम पुरी यांनी आपल्‍या करिअरची सुरुवात एकत्र केली होती. दोघांनीही ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्‍ये एकत्र अभिनयाचे शिक्षण घेतले होते.

तसेच नसीरुद्दीन शाह आणि पंकज कपूर यांचे जवळचे नाते आहे. रत्ना पाठक आणि सुप्रिया पाठक सख्‍ख्‍या बहिणी आहेत.

रत्ना पाठक यांचा विवाह नसीरुद्दीन शाह यांच्‍याशी तर सुप्रिया पाठक यांचा विवाह पंकज कपूर यांच्‍याशी झाला.

पंकज कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांनी आतापर्यंत १० चित्रपटांमध्‍ये एकत्र काम केलं आहे.

रत्ना पाठक आणि नसीरुद्दीन यांची भेट एका थिएटरमध्‍ये नाटकादरम्‍यान झाली होती. त्‍यानंतर दोघांनी १९८२ मध्‍ये विवाह केला. रत्ना पाठक नसीरुद्दीन शाह यांच्‍या दुसर्‍या पत्‍नी आहेत.

नसीरुद्दीन शाह-रतना पाठक दोघे दीर्घकाळ लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. शाह यांनी मनाराशी घटस्फोट घेतला. १९८२ मध्ये शाह – रत्ना पाठक यांनी लग्न केले.

२००६ मध्‍ये नसीरुद्दीन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा इमामुद्दीन एका लोकल रेल्‍वेमधून पडला होता. या दुर्घटनेत इमामुद्दीनच्‍या डोक्‍याला, हात-पायाला गंभीर दुखापत झाली होती.

नसीरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा ही माजिद मजीदी यांच्या चित्रपट ‘बियॉन्ड द क्लाउड्स’मध्‍ये दिसली होती.

एक खास बाब म्हणजे, नसीरुद्दीन शाह आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र आतापर्यंत एकादेखील चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही.

अमिताभ आणि नसीरुद्दीन यांना अनेकदा चित्रपटांमध्‍ये कास्ट करण्‍यात आलं होतं. परंतु, ते चित्रपटांचे प्रोजेक्‍ट रद्‍द करण्‍यात आले होते.

अधिक वाचा – 

PHOTO गॅलरी : विठूरायाचे मनमोहक रुप!

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button