Carrot Paratha Recipes | गाजराचे पराठे, जाणून घ्या रेसिपी | पुढारी

Carrot Paratha Recipes | गाजराचे पराठे, जाणून घ्या रेसिपी

साहित्य :

मध्यम आकाराची 3 ते 4 गाजरे, 2 वाट्या कणिक, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा साखर, कोथिंबीर चिरलेली, 1 चमचा जिरे, पाणी व तेल.

कृती :

सर्वप्रथम गाजरे धुुऊन किसून घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटून गाजराच्या किसात घालावे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे. नंतर पाणी लावून कणिक मळावी. भिजवलेली कणिक 10 मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबिरीसोबत सर्व्ह करावे. (Carrot Paratha Recipes)

Back to top button