shirley ballas : नवऱ्याने प्रेम करण्यासाठी ऑपरेशन करून स्तन वाढवले ! - पुढारी

shirley ballas : नवऱ्याने प्रेम करण्यासाठी ऑपरेशन करून स्तन वाढवले !

लंडन ; पुढारी ऑनलाईन

क्वीन्स ऑफ लॅटिन समजल्या जाणाऱ्या आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध डान्सर शेर्ली बल्लासने (shirley ballas) वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलास केले आहेत. तिने संसार वाचवण्यासाठी ऑपरेशन करून स्तन वाढवल्याची कबूली दिली.

तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत ज्यामुळे अनेकांचा भूवया उंचावल्या. स्वत:ला अधिक कॉन्फिडन्ट वाटण्यासाठी अनेक गोष्टी केल्याचे तिने नमूद केले.

मी माझे दात सरळ करून घेतले. हाता पायांवरील चरबी कमी करून घेतली. मी स्तन मोठे केल्यानंतर नवरा माझ्यावर आणखी प्रेम करेल असे मला वाटत होते, पण मी हे सर्व चुकीच्या कारणांसाठी करत होते असे तिने मुलाखतीमध्ये सांगितले.

सर्वप्रथम तुम्ही स्वत:वर प्रेम केलं पाहिजे हा माझा प्रत्येक महिलेला संदेश असल्याचे तिने म्हटले आहे. डान्सर शेर्लीने बल्लासने कॉर्की बल्लासशी १९८५ साली विवाह केला होता. त्यांचा विवाह २२ वर्ष टिकला. २००७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. २२०२ मध्ये शेर्लीने (shirley ballas) स्तनांची साईज 32B वरून 34DD केली होती.

पहिला पती तिच्यावर नियंत्रण ठेवून शिविगाळ करत असल्याचा आरोपही तिने केला होता. गेल्यावर्षी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला वाटतं, त्याने माझ्यावर पेम केलं. मी माझं आयुष्य त्या माणसासाठी दिलं. तो म्हणत होता की, तु खूप जाड आहेस. तुझे स्तन खूप लहान आहेत.

गेल्यावर्षी, तिने वाढवलेले स्तन काढून टाकले कारण, डॉक्टरांना कॅन्सरचा धोका असल्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button