कॅनडात घराला आगीत भारतीय वंशाच्या कुटुंबाचा मृत्यू | पुढारी

कॅनडात घराला आगीत भारतीय वंशाच्या कुटुंबाचा मृत्यू

ओंटारियो : कॅनडातील ओंटारियोच्या ब्रॅम्पटन शहरात घराला लागलेल्या आगीत मूळच्या भारतीय कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. जोडपे आणि त्यांच्या किशोरवयीन मुलीचा मृतांत समावेश आहे. ही घटना शुक्रवारी समोर आली.

51 वर्षीय राजीव वारिकू, त्यांची 47 वर्षीय पत्नी शिल्पा आणि 16 वर्षीय मुलगी महक अशी त्यांची नावे आहेत. पोलिस आतापर्यंत आगीचे कारण शोधू शकले नाहीत. शेजार्‍यांनी पोलिसांना कळवल्यावर ते घटनास्थळी आले आणि आग विझवली. पोलिसांना ही सर्वच घटना संशयास्पद वाटत आहे. त्याद़ृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.

Back to top button