Oil prices in India : लाल समुद्रात तणाव वाढला, भारतात तेलाच्या किमती वाढणार? | पुढारी

Oil prices in India : लाल समुद्रात तणाव वाढला, भारतात तेलाच्या किमती वाढणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हुथींच्या हल्ल्याचा भारतासह तेल आयात करणाऱ्या देशावर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे तेलाच्या किमतींमध्ये 10-20 डॉलरने वाढ होण्याची शक्यता असून, हे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरेल, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) अध्यक्ष बोर्गे ब्रेडे यांनी सांगितले. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. WEF चे अध्यक्ष बोर्गे बैंडे  स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरात आजपासून सुरू होत असलेल्या 54 व्या WEF वार्षिक जागतिक आर्थिक बैठकी दरम्यान बोलत होते. (Oil prices in India)

येमेनच्या हुथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील व्यापारी जहाजावर वारंवार हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेकडून देखील हुथी बडखोरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांनंतर पुन्हा हुथींनी जोरदार प्रतिउत्तर दिले. यामुळे लाल समुद्रातील तणाव प्रचंड वाढला आहे. याचा परिणाम तेलाच्या किंमतीवर होण्याची अधिक शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अध्यक्षांनी वर्तवली आहे. (Oil prices in India)

हुथी बडखोरांकडून व्यापारी जहाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे लाल समुदात सुरू असलेल्या तणावाचा जागतिक पुरवठा साखळीवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे भातासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी तेलाच्या किंमतीत 10-20 डॉलरपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल, असे देखील बोर्गे बैंडे यांनी म्हटले आहे. (Oil prices in India)

हेही वाचा:

Back to top button