Drone Attack: लाल समुद्रात आणखी एका जहाजावर हुथी बंडखोराकडून ड्रोन हल्ला | पुढारी

Drone Attack: लाल समुद्रात आणखी एका जहाजावर हुथी बंडखोराकडून ड्रोन हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क: इराणी समर्थक हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात आणखी एका जहाजावर आज (दि.२४) ड्रोन हल्ला केला. दरम्यान, हल्‍ला झालेल्‍या जहाजावर भारतीय ध्वज असल्याचा दावा करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले होते; परंतु,या जहाजावर भारतीय ध्वज नसल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडोने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Drone Attack)

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गॅबनच्या ध्वज असलेल्या जहाजावर आज (दि.२४) सकाळी ड्राेन हल्ला झाला. गॅबन हा पश्चिम मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. या देशाचा ध्वज असलेले एमव्ही साईबाबा (MV Saibaba) या कच्चे तेल वाहक करणाऱ्या जहाजाला लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी लक्ष्य केले. यामध्ये २५ भारतीय क्रू मेंबर्स असून ते सुरक्षित आहेत. यापूर्वी शनिवारी याच इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी अरबी समुद्रात इस्रायलच्या एका टँकरला लक्ष्य केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. असे देखील भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Drone Attack)

गॅबनच्या ध्वज असलेले ‘MV Saibaba’ हुथी बंडखोरांचे लक्ष्य

अमेरिकन लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, एमव्ही साईबाबा (MV Saibaba) हे गॅबॉन तेल टँकरला आज पुन्हा इराणी ड्रोनचे लक्ष्य बनले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमेरिकन सैन्यावर एकाचवेळी दोन जहाजांवर हल्ला झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एक नॉर्वेजियन ध्वज असलेले रासायनिक टँकर एमव्ही ब्लामानेन (MV Blamanen) हे होते. हुथी बंडखोरांच्या ड्रोनने आपले लक्ष्य गॅबनच्या ध्वज असलेल्या एमव्ही साईबाबावर ड्रोन हल्ला केला. (Drone Attack)

आतापर्यंत हुथी बंडखोरांकडून १५ वेळा हल्ले

इराण समर्थित येमेनमधील हुथी बंडखोरांकडून १७ ऑक्टोबरपासून दक्षिणेकडील महासागरात व्यावसायिक शिपिंगवर हल्ला सुरूच आहे. व्यावसायिक जहाजांवरील हा १५ वा हल्ला आहे, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडोने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

इस्रायलने हिंसक कारवाया थांबवाव्यात, अथवा…- हुथी बंडखोरांचा इशारा

हुथी दहशतवादी संघटनेचा  प्रवक्ता मोहम्मद अब्दुल- सलाम यांनी X वर केलेल्‍या पोस्टमध्‍ये म्हटले होते की, जोपर्यंत इस्रायल गाझावरील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आणखी सागरी हल्ले केले जातील. इस्रायलने आपल्या हिंसक कारवाया थांबवाव्यात. या कारवाया अशाच चालू राहिल्या तर तांबडा समुद्र तसेच तांबडा समुद्र आणि गल्फ ऑफ एडेन यांना जोडणाऱ्या बाब अल मॅनडेब या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इस्रायली जहाजांना आम्ही लक्ष्य करू, अशी धमकीही हुथी बंडखोरांनी दिली हाेती.

 हे ही वाचा :

Back to top button