” तुम्‍हाला शांततेत जगायचे असेल तर…” इस्‍त्रायलने गाझावासीयांकडे केली ‘ही’ मागणी | पुढारी

" तुम्‍हाला शांततेत जगायचे असेल तर..." इस्‍त्रायलने गाझावासीयांकडे केली 'ही' मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायली सैन्य आणि पॅलेस्‍टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघषं दिवसोंदिवस तीव्र होत आहे. हा रक्तरंजित संघर्षाचा आज १९ दिवस आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 200 हून अधिक इस्‍त्रायलच्‍या नागरिकांना ओलीस ठेवले आहे. आता इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) (Israel Defence Forces)  गाझा पट्टीतील लोकांना इस्त्रायली नागरिकांना ओलिस ठेवलेल्या ठिकाणांची माहिती देण्याची विनंती केली आहे. माहिती देणाऱ्यांनाही त्याने पैसे देण्‍याचीही ऑफर दिली आहे.

‘आयडीएफ’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत, ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांची अचूक माहिती देणार्‍यांना पैसे देण्‍यात येतील. तसेच माहिती देणार्‍याची सुरक्षा आणि गोपनीयतेचे आश्वासन देखील दिले आहे.

‘आयडीएफ’ने आपल्‍या पोस्टमध्‍ये गाझावासीयांना म्‍हटले आहे की, “तुम्हाला शांततेत जगायचे असेल आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य हवे असेल, तर तत्‍काळ मानवतावादी कार्य करा. ओलिसांना दहशतवाद्‍यांनी कोठे ठेवले आहे याची माहिती आम्हाला द्या, इस्रायलचे लष्‍कर तुम्हाला आणि तुमच्या घराला सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. ओलीसांची माहिती देणार्‍या बक्षीस दिले जाईल. आम्ही तुम्हाला हमी देतो की हे सर्व गोपनीयपणे होईल.”

७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने भीषण हल्‍ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी 200 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. इस्‍त्रायल आणि हमास रक्‍तरंजित संघर्षातआतापर्यंत सुमारे १४०० इस्रायली नागरिक आणि गाझा पट्टीतील ५८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी हमासने दोन इस्त्रायलच्‍या दोन महिलांची सुटका केली होती. यापूर्वी शुक्रवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दोन अमेरिकन नागरिकांचीही सुटका केली होती.

हेही वाचा : 

Back to top button