Israel-Hamas war: इस्रायलकडून नॉनस्टॉप बॉम्बहल्ले; गेल्या २४ तासात ४०० जणांचा मृत्यू

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला. यानंतर इस्रालयने देखील जोरदार हवाई प्रतिहल्ला केला. हल्ल्यात इस्रायलने दहशतवाद्यांची अनेक स्थळे उद्धवस्थ केली तसेच हमासच्या दहशतवादी, म्होरक्यांचा खात्मा केला, असा  दावा इस्रायल लष्कराने केला आहे. अद्याप इस्रायल लष्कर थांबयचे नाव घेत नाही. इस्रायलकडून गाझा पट्टीत नॉनस्टॉप बॉम्बहल्ले सुरूच आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात सुमारे ४०० पॅलेस्टिनी मारले गेल्याचे येथील एका आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे. असे वृत्त 'अल जझिरा'ने दिले आहे. (Israel-Hamas war)

पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे सुमारे ४०० पॅलेस्टिनी ठार झालेत, तर काल रात्रभर झालेल्या हल्ल्यांमध्ये ६० जण ठार झाले आहेत. इस्रायलने गाझा शहरातील निवासी भागावरच बॉम्ब हल्ले केले. जिथे जबलिया निर्वासित छावणीचा दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. तसेच गाझातील अल-शिफा आणि अल-कुद्स रुग्णालये देखील याच भागात आहेत. इस्रायलने रात्रभर वेस्ट बँक आणि नाब्लुसवर छापे टाकले, दरम्यान झालेल्या हल्ल्यात दोन पॅलेस्टिनी ठार झाले. (Israel-Hamas war)

इस्रायलने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४६५१ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ७ ऑक्टोबरपासून हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच गाझा शहरात मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट सुरू असून, येथील रुग्णालये धोक्यात असल्याचे 'अल जझिरा'ने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे. (Israel-Hamas war)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news