इस्रायलच्या रणरागिनी : हमासच्या १०० दहशतवाद्यांचा ‘असा’ केला खात्मा | Female Israeli Combat Squad | पुढारी

इस्रायलच्या रणरागिनी : हमासच्या १०० दहशतवाद्यांचा 'असा' केला खात्मा | Female Israeli Combat Squad

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली लष्करातील महिलांच्या तुकडीने हमासच्या १०० दहशतवाद्यांना ठार केले आहे. हमास आणि या तुकडीतील दक्षिण गाझा पट्टीत घमासान झाली. या तुकडीचे नाव Israeli Caracal Battalion असे आहे. या तुकडीकडे सीमेवरील ११ गावांची जबाबदारी आहे.  (Female Israeli Combat Squad)

या तुकडीच्या कमांडर लेफ्टनंट कर्नल बेन येहुदा यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भातील बातमी द जेरुसलेम पोस्ट या वेबसाईटने दिली आहे. येहुदा म्हणाले, “महिला सैनिकांच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. दहशतवाद्यांच्या विरोधातील सर्व लढाया आम्ही जिंकल्या आहेत. सध्या आमच्याकडे ११ गावांची जबाबदारी आहे. जमिनीवरून युद्धाची शक्यता लक्षात घेऊन आमची तयारी सुरू आहे. दक्षिण गाझा आणि इजिप्तची सीमा आम्ही सांभाळत आहोत.”  (Female Israeli Combat Squad)

अनेक इस्रायली नागरिकांचा जीव वाचवले | Female Israeli Combat Squad

“महिला सैनिकांनी उत्तम कामगिरी केली आहे. आमच्या तुकडीने अनेकांची जीव वाचवले आहेत. गरज प्रसंगी वैद्यकीय उपचार देणे, हेलिकॉप्टरच्या मदतीने मदत पोहोचवणे ही कामे आम्ही केली आहेत,” असे त्या म्हणाल्या.

“इस्रायलच्या लष्करात महिला आहेत. महिलांच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्यांना आम्ही चोख उत्तर दिले आहे. आमच्या महिलांनी घेतलेले प्रशिक्षण आणि युद्धभूमीवर त्याचा केलेला वापर यामुळे या शंकांना आता पूर्णविराम मिळेल. आम्ही धाडसाने लढलो, अनेज जीव वाचवले आणि हिरो ठरलो.”

हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर बेन-येहुदा यांच्या बटालियनला इजिप्तच्या सीमेवर पाठवण्यात आले. या ठिकाणी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. त्यानंतर महिला लष्कर आणि हमासचे दहशतवादी यांच्यात ४ तास युद्ध सुरू होते. या परिसरात सर्व दहशतवाद्यांना मारण्यात या तुकडीला यश आले.

हेही वाचा

Back to top button