महाभियोगांतर्गत बायडेन यांची चौकशी | पुढारी

महाभियोगांतर्गत बायडेन यांची चौकशी

वॉशिंग्टन; वृतसंस्था :  महाभियोगातंर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची चौकशी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे प्रवक्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते केव्हिन मॅकर्थी यांनी चौकशी सुरू केली आहे. 2009 ते 2017 या कालावधीत उपराष्ट्राध्यक्ष असताना मुलगा हंटर याला व्यावसायिक करारात फायदा मिळवून दिल्याचा बायडेन यांच्यावर आरोप आहे. आता बायडेन यांच्या चौकशीसाठी प्रतिनिधीगृहात औपचारिकरीत्या प्रस्ताव दाखल केला जाईल.

मॅकर्थी म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी अनेक फोन कॉल, पैशांचा व्यवहार आणि अन्य हालीचालींबाबत पुरावे दिले आहे. यामध्ये बायडेन कुटुंबाने भ्रष्टाचार केल्याचे अनेक संकेत मिळत आहे. अर्थाय यामध्ये स्वतः बायडेन सहभागी होते की याबाबतची माहिती समोर आलेली नाही. बायडेन यांच्या विरोधातील चौकशी युक्रेनमधील हंटर बायडेन यांच्या व्यावसायिक करारावर केंद्रित असणार आहे. रिपब्लिकन पक्षाने यावर्षीच्या सुरुवातीपासून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

… तर पायउतार होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील

पुरावे मिळतील त्या दिशेने चौकशी केली जाईल. 535 सदस्य असणार्‍या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे 222 सदस्य आहेत. महाभियोग चालवून आतापर्यंत अमेरिकेत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाला पदावरून हटवण्यात आले नाही. चौकशीत बायडेन दोषी ठरल्यास ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असे मॅकर्थी यांनी सांगितले.

Back to top button