जपानमध्ये 3 हजार खोटे कॉल करणार्‍या महिलेला अटक | पुढारी

जपानमध्ये 3 हजार खोटे कॉल करणार्‍या महिलेला अटक

टोकिओ; वृत्तसंस्था : सुमारे 3 हजार खोटे इमर्जन्सी कॉल करणार्‍या 51 वर्षीय हिरोको हतागामी नावाच्या महिलेला जपानच्या पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आहे. ही महिला पोलिस, रुग्णालये आणि फायर ब्रिगेडला गेल्या तीन वर्षांपासून खोटे फोन करून त्रास देत होती. ही महिला एकटी आणि बेरोजगार आह. त्यामुळे कोणीतरी तिचे म्हणणे ऐकावे आणि तिच्याकडे लक्ष द्यावे, अशी महिलेची इच्छा होती, असे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

हिरोको राजधानी टोकिओनजीकच्या मात्सडो शहरात बेरोजगारीचे जीवन कंठत होती. अशातच तिने आपले घर, शेजारी आणि मार्केटमधील लोकशनवरून खोटे इमर्जन्सी कॉल केले. फायर ब्रिगेडला सुमारे 2 हजार 761 कॉल करून हिरोकोने त्रास दिला हे विशेष! हिरोकोने ऑगस्ट 2020 ते मे 2023 या काळात वांरवार खोट कॉल करून फायर विभागाला अ‍ॅम्ब्युलन्स पाठवण्याची विनंती केली. अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचल्यानंतर मात्र ती मदत घेण्यास मनाई करत असे. जपानच्या समाजव्यवस्थेत विभक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे. जपानमध्ये सुमारे 15 लाख लोक एकटेपणाचे जीवन व्यतीत करत आहेत.

Back to top button