Belgrade shooting | सर्बिया हादरले! अल्पवयीन मुलाचा शाळेत अंधाधुंद गोळीबार, ८ मुलांसह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू | पुढारी

Belgrade shooting | सर्बिया हादरले! अल्पवयीन मुलाचा शाळेत अंधाधुंद गोळीबार, ८ मुलांसह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

बेलग्रेड (सर्बिया); पुढारी ऑनलाईन : सर्बियाच्या राजधानी बेलग्रेड येथील (Belgrade shooting) एका शाळेत बुधवारी एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केला. यात ८ मुले आणि शाळेतील सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात ६ मुले आणि १ शिक्षक जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेने सर्बियातील सर्वात मोठे शहर बेलग्रेड हादरले आहे.

पोलिसांनी शूटरची ओळख पटवली असून त्याने त्याच्या वडिलांच्या बंदुकीने अंधाधुद गोळीबार केला. त्याला शाळेच्या आवारात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबार करणारा मुलगा १४ वर्षाचा असून तो बेलग्रेडमधील एका शाळेचा विद्यार्थी आहे. (Belgrade shooting)

पोलिसांनी सांगितले की त्यांना सकाळी ८:४० च्या सुमारास व्लादिस्लाव रिबनीकर प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. सर्बियामधील प्राथमिक शाळेत पहिले ते आठवीपर्यंतचे शिक्षणाची सोय आहे.

पोलिसांनी सांगितले की त्यांना सकाळी ८:४० च्या सुमारास व्लादिस्लाव रिबनीकर प्राथमिक शाळेत गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. सर्बियामधील प्राथमिक शाळेत पहिले ते आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.

“मी गोळीबाराचा ऐकला. त्याने न थांबता गोळीबार केला. मला कळत नव्हते की होतंय. आम्हाला फोनवर काही मेसेज येत होते.” असे एका विद्यार्थ्याने सांगितले. “त्याने (शूटर) पहिल्यांदा शिक्षकावर गोळीबार केला आणि नंतर डेस्कवर बसलेल्या मुलांवर गोळीबार केला,” अशी माहिती दुसऱ्या एका विद्यार्थ्याने दिली.

अमेरिकेत अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्या तरी सर्बिया आणि बाल्कन प्रदेशात अलिकडील वर्षांत अशा गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत. याआधी २०१३ मध्ये बाल्कन युद्धादरम्यान मध्य सर्बियातील एका गावात १३ लोक मारले गेले होते.

हे ही वाचा :

Back to top button