पत्नीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षांनी फाशी शिक्षा | पुढारी

पत्नीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षांनी फाशी शिक्षा

ह्युस्टन; वृत्तसंस्था :  पत्नी फराहला मृत पाहण्यासाठी ह्युस्टन पूर्वचा पोलिस अधिकारी रॉबर्ट फ्रैटा याने तिच्या खुनाचा कट रचला. यासाठी त्याने १९९४ मध्ये दोन शार्पशूटरची नेमणूक केली. आपल्या घराच्या पार्किंगमध्ये ३३ वर्षीय फराहच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली होती.

याप्रकरणी दोन्ही शार्पशूटरना फाशीची शिक्षा झाली तसेच हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिच्या पतीलाही दोषी ठरवून १९९६ मध्ये फाशीची  शिक्षा सुनावली होती. मात्र, फेडरल न्यायाधीशांनी ही शिक्षा रद्द केली होती. त्यानंतर याप्रकरणी पुन्हा सुनावणी होऊन २००९ मध्ये फाशीची शिक्षा कायम करण्यात आली. टेक्सास शहरात यावर्षी फाशीची शिक्षा झालेले ते पहिले, तर अमेरिकेतील दुसरे कैदी आहेत.

Back to top button