ऋषी सुनाक यांच्या बागेत बसवले १३ लाख पौंडाचे शिल्प | पुढारी

ऋषी सुनाक यांच्या बागेत बसवले १३ लाख पौंडाचे शिल्प

लंडन : वृत्तसंस्था :  देशाची आर्थिक स्थिती बिकट असताना लोकांच्या कराच्या पैशातून १३ लाख पौंडाचे महागडे शिल्प ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बागेत लावण्यावरून ब्रिटनमध्ये ऋषी सुनाक सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

१० डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बागेत उभारलेल्या री या शिल्पाचे छायाचित्र एका दैनिकाने प्रकाशित केल्यानंतर पंतप्रधान सुनाक यांच्या सरकारवर चहू बाजूंनी टीका सुरू झाली आहे. सुदबी या लिलाव संस्थेच्या एका लिलावात हेन्री मूर या जगविख्यात शिल्पकाराने बनवलेली ही बसलेल्या महिलेची शिल्पकृती ब्रिटन सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आली होती. ती सरकारी संग्रहालयात ठेवण्याऐवजी १० डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाच्या बागेत ठेवण्यात आली असल्याने टीका सुरू झाली आहे.

आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी लोकांनी सुनाक यांना निवडून दिले असताना सार्वजनिक संपत्तीचा असा गैरवापर चुकीचा असल्याचे आक्षेप घेणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. यावर आता विरोधकांनीही सुनाक यांना घेरायला सुरुवात केली आहे.

Back to top button