Sharad Sagar : भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत डंका, ‘हार्वर्ड’च्‍या निवडणुकीत ऐतिहासिक विजय | पुढारी

Sharad Sagar : भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत डंका, 'हार्वर्ड'च्‍या निवडणुकीत ऐतिहासिक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील सर्वसामान्‍य कुटुंबातील शरद विवेक सागर ( Sharad Sagar )  यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात इतिहास रचला आहे. हार्वर्ड ग्रॅज्युएट स्‍कूल ऑफ एज्‍युकेशन या विद्यार्थी संघटनेच्‍या अध्यक्षपदी त्‍यांची निवड झाली आहे. शरद सागर यांना ५० देशांमधील १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान केले. या निवडणुकीत ९ उमेदवार रिंगणात होते. त्यांचा पराभव करत विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद ‍भूषविण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
या निवडणुकीबाबत शरद सागर यांनी आपल्‍या फेसबुक पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ” ५० हून अधिक देश १२०० हून अधिक विद्यार्थी, ९ उमेदवार आणि निवडणूक. हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये विद्यार्थी सरकारच्या अध्यक्षपदी निवड होणारा मी पहिला भारतीय झालो आहे. याचा आनंद आहे. हार्वर्ड विद्यापीठापासून खूप दूर जन्‍मगाव असणाऱ्यामाझ्‍यासारख्‍या विद्यार्थासाठी हे असंभव होते. मात्र ‘हार्वर्ड’च्‍या विद्यार्थ्यांनी माझ्‍यावर विश्‍वास दाखवला याबद्‍दल मी त्‍यांचा आभारी आहे. मी विद्यार्थ्यांच्या जीवनात वास्‍तववादी बदलासाठी काम करेन.”

कोण आहेत शरद विवेक सागर?

Sharad Sagarशरद विवेक सागर यांचा जन्‍म भारताचे पहिले राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्रपसाद यांचे जन्मगाव असणार्‍या बिहारमधील सिवान जिल्‍ह्यातील जीरादेई येथे एका सामान्‍य कुटुंबात झाला. वयाच्‍या बारावर्षांपर्यंत त्‍याचे पाटणा येथेच शिक्षण झाले. ४ कोटी रुपयांची शिष्‍यवृत्ती मिळाल्‍यानंतर ते अमेरिकेला अध्‍ययनासाठी गेले. बारावीची परीक्षा देण्‍यापूर्वी त्‍यांनी भारताचे ६ देशांमध्‍ये प्रतिनिधित्‍व केले होते. टफ्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये त्‍याने आंतरराष्‍ट्रीय संबंधांवर पदवीसाठी त्‍यांना स्‍कॉलरशिप मिळाली. यानंतर हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी त्यांना HGSE अनुदान आणि KC महिंद्रा शिष्यवृत्ती मिळाली. त्‍याने हार्वडेमध्‍ये सर्वाधिक स्‍कॉलरशिप घेतल्‍या आहे. शरद विवेक सागर हे स्‍वामी विवेकानंद यांना आपला आदर्श मानतात. अमेरिकेत युथ आयकॉन अशी ओळख असलेला शरद सागर हे मितभाषी आणि शांत स्‍वभावाचे आहेत.

Sharad Sagar : काय आहे डेक्सटेरिटी ग्लोबल?

दहावीनंतर २००८ मध्ये शरद सागर यांनी द डेक्सटेरिटी ग्लोबल ग्रुपची स्‍थापना केली. हा ग्रुप विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी आणि प्रशिक्षणाद्वारे तळागाळात नेतृत्व निर्माण करण्याचे काम करतो. ही ग्रुप भारतातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्‍ध करुन देते. या ग्रुपने जगभरातील विविध शिक्षण संस्‍थांमध्‍ये ५२ कोटी रुपयांहून अधिकस्‍कॉलरशिप मिळवून दिली‍ आहे. डेक्‍टेरिटी क्‍लासरूम, डेक्‍टेरिटी सेवा आणि यंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (YPDP) यासारखे उपक्रम ही त्‍यांनी राबवले. DexConnect हे शाळा आणि समुदायांमध्ये सेवा प्रदान तयारीचे व्यासपीठ आहे तर DexSchool ही किशोरवयीन मुलांमध्‍ये नेतृत्व आणि उद्योजक निर्माण करते.

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांमध्यॆ शरद सागर यांचे नाव आघाडीवर आहे. २०१६ मध्‍ये अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी व्‍हाईट हाउसमध्‍ये झालेल्‍या एका विशेष सभेसाठी त्‍यांना निमंत्रण दिले होते. त्‍यांनी अमेरिकेतील विविध चर्चासत्रांमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील काही जण त्‍यांना ‘आजचा विवेकानंद’ असे संबोधतात. २०१६ मध्‍ये नोबोल शांताता पुरस्‍कार सोहळ्यात विशेष पाहुणे म्‍हणूनही त्‍यांना निमंत्रण मिळाले . सागर हे भारतीय सभ्यता आणि संस्‍कृतीबाबतची माहिती पाश्‍चात्‍य देशात अत्‍यंत प्रभावीपणे देतात.

‘फोर्ब्स’च्‍या यादीतही समावेश

ख्‍यातनाम फोर्ब्स मासिकाच्‍या ३० वर्षांच्‍या आतील सर्वात प्रभावशाील व्‍यक्‍तींच्‍या यादीत शरद सागर यांचा समावेश होता. रॉकफेलर फाउंडेशन्सच्या 100 नेक्स्ट सेंच्युरी इनोव्हेटर्स लिस्ट आणि ब्रिटनच्‍या राणीच्या यंग लीडर्स लिस्टमध्ये देखील त्‍यांच्‍या नावाचा समावेश होता. अमेरिकेत वास्‍तव्‍य असूनही भारतीय संस्‍कृती आणि सभ्‍यतेचे तॆ पालन करतात. तसेच सर्वाधिक भारतीयांपर्यंत आपले मत पोहचावे यासाठी फेसबुक पोस्‍टही हिंदी भाषेतून लिहितात. शरद सागर यांना सोशल मीडियावर फॉलो करणार्‍यांची संख्‍या ५ लाखांहून अधिक आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button