kisi ka bhai kisi ki jaan : सलमानच्या नव्या चित्रपटाचा टिजर रिलीज | पुढारी

kisi ka bhai kisi ki jaan : सलमानच्या नव्या चित्रपटाचा टिजर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेते सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. यामध्ये त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) हा चित्रपटही आहे, जो काही काळ त्याच्या नावामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘कभी ईद कभी दिवाली’ असे होते, जे काही कारणास्तव बदलण्यात आले. सलमान खानने २६ ऑगस्ट रोजी एका व्हिडिओसाठी चित्रपटाचे नवीन नाव जाहीर केले. परंतु आज टीझरसह त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. चाहत्यांचा जीव म्हटल्या जाणाऱ्या भाईजानने त्याच्या चित्रपटाचा एक जबरदस्त टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये सलमानची बोल्ड आणि दमदार स्टाईल पाहायला मिळत आहे. हा टीझर व्हिडिओ स्वतः सलमानने त्याच्या ट्विट हँडलवर शेअर केला आहे. यासोबतच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (kisi ka bhai kisi ki jaan)

टीझरमध्ये सलमान खान एका खडबडीत भागात बुलेट चालवताना दिसत आहे, त्यानंतर तो चालताना दिसत आहे. त्याच्या हातात लकी ब्रेसलेटही दिसत आहे. तसेच सलमानचे लांब केस, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर हसू आहे. त्याचा हा अवतार त्याच्या चाहत्यांनाही आवडला आहे.

यानंतर चित्रपटाचे नाव शेवटी दाखवले आहे. या व्हिडिओला काही वेळातच अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच यामध्ये कोणते स्टार्स बघायला मिळणार, हे चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्याचे नावही समोर आले आहे. हा टीझर रिलीज करताना सलमान खानने ‘#KisiKaBhaiKisiKiJaan’ अशी कॅप्शन लिहिली आहे.

त्याने या चित्रपटात दिसणार्‍या स्टार्सना टॅग केले आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, जगपती बाबू आणि राघव जुयाल यांसारखे अनेक कलाकार आहेत. सलमानचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’मध्येही दिसणार आहे.

Back to top button