Sridevi death: कॉल डिटेल्ससह बोनी कपूर यांची कसून चौकशी | पुढारी

Sridevi death: कॉल डिटेल्ससह बोनी कपूर यांची कसून चौकशी

दुबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू प्रकरणी दुबई पोलिस कसून चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी बोनी कपूर यांच्यासह श्रीदेवी यांच्यासोबत दुबईत आलेल्या कुटुंबीयांची देखील सोमवारी चौकशी करण्यात आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे पोलिस याप्रकरणाची कसून चौकशी  करत आहेत.  

वाचा : श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून

श्रीदेवी यांच्या मृत्यूचे गुढ वाढल्यामुळे आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दुबई पब्लिक प्रॉसिक्यूशन (DPP) यांच्या परवानगीशिवाय बोनी कपूर यांना दुबई सोडण्याची परवानगी नाही. शवविच्छेदनानंतर बळावलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर दुबई पोलिस श्रीदेवी यांचे सर्व कॉल  डिटेल्स तपासून पाहत आहेत. याशिवाय श्रीदेवी यांच्यावर आतापर्यंत झालेल्या मेडिकल चाचण्या, शस्त्रक्रिया आणि आजारासंबंधीची सर्व माहिती देखील तपासून पाहण्यात येत आहे. 

वाचा : श्रीदेवी: अशी होती लाईफ स्टाईल, इतके घ्यायच्या मानधन 

एका इंग्रजी वृत्तानुसार श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी अनिल अंबानी यांचे १३ सीटर विमान दुबईत दाखल झाले आहे. पण  चौकशीचा दाखला देत दुबई पब्लिक प्रॉसिक्यूशन यांनी  श्रीदेवी यांचे पार्थिव मायदेशी आणण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे आज दुपारनंतरच पार्थिव मायदेशी येण्याची शक्यता आहे.  श्रीदेवी यांचा मृत्यू बाथ टबमध्ये बुडून झाल्याचे एका अहवालानुसार पुढे आले. तसेच शवविच्‍छेदन अहवालात अल्‍कोहोलचे अंश आढळले आहेत. 

वाचा : बालकलाकार ते लेडी सुपरस्टार श्रीदेवी

Back to top button