मानवाधिकार उल्लंघनाचे अमेरिकेचे आरोप केंद्र सरकारने फेटाळले | पुढारी

मानवाधिकार उल्लंघनाचे अमेरिकेचे आरोप केंद्र सरकारने फेटाळले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणारा अमेरिकेने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. हा अहवाल भेदभाव करणारा असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. या अहवालावर भारताने अमेरिकेत सुरू असलेल्या वाशिंक हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले आहे. अमेरिकेत वंश वादावरून होत असलेले हल्ले आणि हिंसाचाराविषयी आम्ही अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान वारंवार हा मुद्दा उपस्थित केला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी दिली.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांकडे आमचे लक्ष आहे. आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून भारताचा निषेध नोंदविला असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने भारतातील मानवाधिकार उल्लंघनाविषयी बोलण्याआधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार यामध्ये संतुलन राखण्याची गरज आहे. अमेरिकेने जम्मू-काश्मीर व मणिपूरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा अमेरिकेने दिलेला अहवाल हा निव्वळ खोडसाळपणा आणि भेदभावपूर्ण असल्याचेही जायस्वाल यांनी स्पष्ट केले. खालिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू विषयावर अमेरिकेने लावलेल्या आरोपांचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खंडन करून याबाबत उच्च स्तरीय समिती गठित केल्याचे उत्तर अमेरिकेला दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button