चाँद नवाब यांचा ‘रिटेक पे रिटेक’; व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल! (Video) | पुढारी

चाँद नवाब यांचा 'रिटेक पे रिटेक'; व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल! (Video)

कराची: पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानी टीव्ही रिपोर्टर चाँद नवाब यांना तुम्ही ओळखत असालच. सोशल मीडियावर त्यांनी जगभरातील लोकांना हसवले आहे. तुम्ही सोशल मीडियावर कधी ना कधी ‘अपनों को ईद मनाने’ हे वाक्य वारंवार बोलत असलेला व्हिडिओ पाहिला असेल. आता हेच नवाब लोकांना कराचीमधील सुप्रसिद्ध पानाबद्दल सांगत आहेत. 

चाँद नवाब यांचा ‘अपनों को ईद मनाने’ हा व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला होता की, ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाजुद्दीन यांनी तो चाँद यांची भूमिका केली होती.  त्यांचा आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी चाँद यांचा रेल्वे स्थानकावरील री-टेकवर री-टेक घेणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा स्थानकावर मोठी गर्दी होती आणि त्यामुळे त्यांना वाक्य पूर्ण करता येत नव्हते. हा प्रसंग 2008मध्ये घडला होता. 

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चाँद नवाब हे प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, कराचीतील पान खुप लोकप्रिय आहे. पण यासाठीचा पी-टू-सी करताना चाँद यांनी अनेक रि-टेक घेतले आहेत. वारंवार शब्द चुकल्यामुळे किंवा वाक्य विसरल्यामुळे किंवा आणखी काही झाल्यामुळे चाँद पुन्हा पुन्हा टेक घेत आहेत. 

2008मधील चाँद यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात रेल्वे स्थानकावरील गर्दीमुळे त्यांना पी-टू-सी नीट करता येत नव्हता. पण आता पानच्या दुकानात त्यांना कोणीही त्रास देणारे नव्हते तरीही चाँद नवाब यांनी कमाल केली आहे. तुम्ही देखील पाहा चाँद नवाब यांचा हसून हसून पोट दुखवणारा व्हिडिओ…

https://www.youtube.com/watch?v=llTfRcnsPQc

Back to top button