चक्क शेतकऱ्याने बनवले विमान…! | पुढारी | पुढारी

चक्क शेतकऱ्याने बनवले विमान...! | पुढारी

बिजिंग (चीन) : पुढारी ऑनलाईन

कांदा आणि लसणाचे उत्पादन घेणारे चीनमधील झू यूऐ पेशे शेतकऱ्याने स्वत: च्या कष्टाने विमान बनवले आहे. त्याचे एक स्वप्न होते की, त्यांना स्वत: ला विमान चालवता यावे. परंतु त्यांचे हे स्वप्न आयुष्यात पूर्ण झाले नाही. झू यूऐ यांनी हार न मानता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही केले त्याची चर्चा जगभरात होत आहे. या शेतकऱ्याने एअरबस ए ३२० ला मागे टाकेल असे विमान बनवले आहे. परंतू ते हवेत उडू शकत नाही. 

 आश्चर्यचकित झाले लोक…

चीनमधील उत्तरपूर्व गव्हाच्या शेताजवळ हे विमान बनविले आहे. झू यूऐ यांनी अत्यंत कष्टाने माध्यमिकपर्यंत शिक्षण केले आहे. त्यांनी शेतीबरोबर कायून शहरात वेल्डिंगचेही काम केलेले आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, ‘माझ्या आयुष्यात मी विमान खरेदी करू शकत नाही. परंतू ते तयार करू शकतो.’

विमान बनवण्यासाठी खर्च केली आयुष्यभराची कमाई…

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झू यूऐ यांनी आपल्या कमाईचे ३ लाख ७३ हजार डॉलर खर्च केले आहेत. ही रक्कम त्याच्या आयुष्यभरात कमावलेली आहे. त्यांनी विमान बनवण्याची सुरूवात एयरबस ३२० या खेळण्यांपासून केली. त्यांनी विमान बनवण्यासाठी मेहनत, संशोधनही केले आहे. कठोर परिश्रमातून त्यांनी विमानाचा समोरील भाग, पंखे, विमानाचा मागील भाग, इंजन, कॉकपीट हे बनवण्यासाठी ६० टन स्टील वापरले आहे.   

विमानात बसून लोक करणार जेवण…

हे विमान बनवण्यासाठी झू यांना विमानचे आकर्षण असणाऱ्या पाच कामगारांनी मददत केली. तयार झालेल्या या विमानाला हॉटेलसारखे (धाबा) बनवलेले जाणार आहे. त्यांनी सांगितले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही लाल रंगाचे गालिचे घालणार आहोत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना आनंद वाटेल. येथे येणाऱ्या ग्राहकाना बर्गर, फ्रेंच पद्धतीचे, चायनीज अशा कोणते जेवण द्यायचे हे ठरवलेले नाही. यावरून हे सिद्ध होते कि, माणसाने मेहनत घेतली तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. 


 

Back to top button