‘हा’ राजपुत्र राहणार भुताच्या राजवाड्यात? | पुढारी

'हा' राजपुत्र राहणार भुताच्या राजवाड्यात?

लंडन: पुढारी ऑनलाईन

हॉलीवुड अभिनेत्री मेगन मार्केलने १९ मे रोजी इंग्लंडच्या शाही घराण्यातील प्रिन्स हॅरीशी विवाह केला. आता या नवविवाहीत  जोडप्याच्या साध्या साध्या गोष्टीवरही लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मेगनने बाळाला जन्म दिल्यानंतर रॉयल बेबीसह हे कुटुंब नव्या घरात राहायला जाणार असल्याची सध्या चर्चा सर्वत्र सुरू असताना राजवाड्याच्या आतील गोष्टी मीडियात समोर येऊ लागल्या आहेत. प्रिन्स हॅरी राजवाडा सोडण्यामागचे कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी ते दोघे कुठे राहणार आहेत याचा खुलासा झाला आहे.

थोरल्या सूनबाई केट मिडल्टन आणि धाकट्या सूनबाई मेगन मर्केल यांचे आपापसात खटके उडू लागल्याने प्रिन्स हॅरीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ते दोघे आता राणी एलिझाबेथ यांनी प्रिन्स हॅरीला लग्नाची भेट म्हणून दिलेले फ्रॉगमोअर कॉटेजमध्ये राहायला जाणार आहेत. 

Image result for फ्रॉगमोर कॉटेज

फ्रॉगमोअर कॉटेज हे ३५ एकरमध्ये पसरले आहे. हे कॉटेज भुताटकीचे मानले जाते. कारण येथे आठवा किंग एडवर्ड आणि त्याची पत्नी यांचा याच ठिकाणी दफनविधी करण्यात आला आहे. असे सांगितले जाते की, काही वर्षापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जात असत. 

Image may contain: 1 person, hat

राहत्या राजवाड्यात त्या दोघांना खाजगी आयुष्य जगता येत नसल्याकारणाने ते दोघे वेगळे राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button