भारताने एक पाऊल उचलल्यास आम्ही दोन उचलण्यासाठी तयार : इम्रान खान  | पुढारी

भारताने एक पाऊल उचलल्यास आम्ही दोन उचलण्यासाठी तयार : इम्रान खान 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आम्हाला मजबूत द्विपक्षीय संबंध हवे आहेत, त्यामुळे भारताने एक पाऊल उचलल्यास आम्ही दोन पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत, असे मत पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानी बाजूने करतारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभानंतर बोलताना इम्रान खान यांनी वरील मत व्यक्त केले.

जर फ्रान्स आणि जर्मनी अनेक युद्धानंतर एकत्र शांततेत राहत असतील, तर भारत आणि पाकिस्तान का होऊ शकत नाही असे इम्रान म्हणाले. देशातील नागरिक आणि लष्करी नेतृत्वासह  माझा राजकीय पक्ष, उर्वरित राजकीय पक्ष लष्कर तसेच सर्वं संस्थाना आता पुढे पाहायला हवे अशी भूमिका असल्याचे इम्रान यांनी सगितेले. दोन्ही देशांतील शांततेवर इम्रान यांनी बरीच फलंदाजी केली, पण दहशतवादावर एक चकार शब्द काढला नाही. 

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सीमेपलीकडेनून जोपरर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत कोणतीही बोलणी होणार अशी थेट भूमिका घेतली आहे. सार्क परिषदेमध्येही सहभाग घेणार ऩसल्याचे म्हटले आहे.  

Back to top button