मुलांना जन्म द्या, अन् रोख बक्षीस मिळवा | पुढारी

मुलांना जन्म द्या, अन् रोख बक्षीस मिळवा

टोकिओ :

वृद्धांची वाढती संख्या आणि घटत चाललेला जन्मदर, यामुळे जपानची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या देशात असे एक शहर आहे की, तेथे या घटत्या लोकसंख्येवर पर्याय शोधण्याचे प्रयत्न होत आहेत. दक्षिण जपानमधील कृषिप्रधान शहर असलेल्या नागीची लोकसंख्या सहा हजार आहे. लोकसंख्या वाढवण्याबाबत या शहराचे प्रशासन २००४ पासून कार्य करत आहे.

वाचा : पाकिस्‍तानमध्ये दहावी पास पायलट 

याअंतर्गत कुटुंबात जन्मणार्‍या पहिल्या अपत्यास एक लाख येन (६३ हजार रुपये) नागी शहर प्रशासनाकडून बक्षिसादाखल देण्यात येतात. दुसर्‍या अपत्यास ९५ हजार रुपये, तर पाचव्या अपत्यास अडीच लाख रुपये देण्यात येतात. याशिवाय स्वस्तात घर व अन्य सोयीही उपलब्ध करून देण्यात येतात.

 

Back to top button