इराणबरोबर तणाव; अमेरिकेने तैनात केली लढाऊ  विमाने | पुढारी

इराणबरोबर तणाव; अमेरिकेने तैनात केली लढाऊ  विमाने

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

इराणने अमेरिकेचे टेहळणी विमान पाडल्यानंतर उभय देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाने आता गंभीर वळण घेतले आहे. अमेरिकेने कतारमध्ये एफ-22 स्टेल्थ ही लढाऊ  विमाने तैनात केली आहेत.

गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. अमेरिकेने इराणवर हल्‍ला करण्याची तयारीही केली होती.  मात्र, या हल्ल्यात किमान दीडशे लोकांचा बळी जाईल, हे समजल्यावर हल्ल्याचा निर्णय ऐनवेळी मागे घेतल्याचे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. त्यानंतरही अमेरिकेने सायबर हल्‍ला करून इराणला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. आता अमेरिकेने कतारमध्ये एफ-22 स्टेल्थ विमाने तैनात केल्याने इराणच्या खाडीवर युद्धाचे ढग जमू लागल्याची भीती व्यक्‍त होत आहे.

मात्र, अमेरिकन सैन्य आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी ही विमाने तैनात केल्याचे अमेरिकन हवाई दलाकडून सांगण्यात आले. तिथे नेमकी किती विमाने तैनात केली हे स्पष्ट झाले नसले, तरी कतारच्या तळावरून पाच एफ-22 विमानांनी उड्डाण केल्याचे छायाचित्र समोर आले आहे.

 

Back to top button