दहशतवादी हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी रशियाला केले सतर्क  | पुढारी

दहशतवादी हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी रशियाला केले सतर्क 

मॉस्को : वृत्तसंस्था 

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट अमेरिकेच्या गुप्तरच विभागामुळे उधळला गेला आहे. रशियाचे गृह मंत्रालय आणि प्रशासकीय मुख्यालय क्रेमलीनने याबाबतचा खुलाास केला. 

क्रेमलीनने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून नियोजित दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या या माहितीच्या आधारे रशियन फेडरल एजन्सीने दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्‍या दोन नागरिकांना अटक केली. दरम्यान, या कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून त्यांचे आभार मानले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढविण्याबाबत तसेच दहशतवादाचा एकत्रित विरोध करण्यासाठी कटिबद्ध राहण्याबाबत चर्चा झाली. यापूर्वी 2017 मध्येही ट्रम्प यांनी पुतीन यांना सेंट पीटस्बर्ग येथे दहशतवाद्यांच्या कटाची माहिती दिली होती. तेव्हाही पुतीन यांनी ट्रम्प यांचे फोन करून आभार मानले होते. 

Back to top button