डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट; थेट इंटरपोलकडे मागितली मदत! | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट; थेट इंटरपोलकडे मागितली मदत!

तेहरान : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प आणि वाद हे समीकरणच बनले आहे. त्यांनी आजवर अनेक सनसनाटी दावे करून जागतिक पटलावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. आता त्यांच्या विरोधात निघालेल्या अटक वॉरंटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे हाडवैर असलेल्या इराणने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.  इतकेच नाही, तर त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलकडे मदत मागण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर १२ जणांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात इराणीयन मेजर जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या केल्याप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आले आहे. 

तेहराण वकील अली अल्कासीमदेर यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्यासह ३० जणांवर सुलेमानी यांच्या हत्येचा आरोप ठेवला आहे.  तीन जानेवारीला सुलेमांनी बगदादमध्ये हत्या करण्यात आली होती. आयएसएनए वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. 

Back to top button