अमेरिकेत मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका! | पुढारी

अमेरिकेत मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेत निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू आहे. अमेरिकेत ४५ व्या राष्ट्राध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार, यावर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर एका मागून एक ट्विट केले. परंतु, त्यांनी असे एक ट्विट केले, ज्यामुळे ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विट ब्लॉक केले. चुकीच्या माहितीचा हवाला दिल्याने ट्विटरने ही कारवाई केली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत लिहिले होते की, आम्ही लोक मोठ्या विजयाकडे आगेकूच करत आहोत. परंतु विरोधक रिझल्ट चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, ही चुकीची माहिती दिल्याने ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरून हे ट्विट हटवले. अमेरिकेत मतमोजणी सुरू असताना ट्रम्प यांनी ट्विट केले की, ‘संपूर्ण देशात आमची चांगली स्थिती आहे, थँक्यू!’

दुसऱ्या टिव्टमध्ये म्हटले की, आम्ही खूप पुढे जात आहोत. आम्ही विरोधकांना कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू देणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरकडून ब्लॉक करण्यात आले आणि चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. 

जेव्हा आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटर हँडलला जाल तर तुम्हाला तिथे एक सूचना लिहिलेली मिळेल. या ट्विटमध्ये शेअर केलेले सर्व सामग्री, लेखन विवादित आहे आणि यामध्ये काही भ्रामक माहिती असू शकते. ट्विटरने स्पष्टीकरण दिलं की, आम्ही निवडणुकीबद्दल संभावित भ्रामक दावा करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर एक सूचना जारी केली आहे. ही कारवाई पॉलिसी अंतर्गत आहे.

वाचा – अमेरिकेत मतदानानंतर हिंसाचार उसळण्याचे संकेत

वाचा – #USAElections2020 जो बायडेन यांचा १० राज्यामध्ये दणदणीत विजय! डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर

ट्रम्प यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, ‘ते आज रात्री मोठे भाषण करणार आहेत.’ 

ट्रम्प येथे येथे आघाडीवर 

साऊथ डकोटा, मिसॉरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, इंडियाना.

जो बायडन येथे आघाडीवर 

कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलैंड, मॅसाचुसेट्स, न्यूजर्सी, रोड आइलँड, वाशिंग्टन.

Back to top button