इस्राईलमधील धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी, ४० जणांचा मृत्यू, १५० जखमी | पुढारी

इस्राईलमधील धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी, ४० जणांचा मृत्यू, १५० जखमी

माउंट मेरन (इस्त्राईल) : पुढारी ऑनलाईन

इस्राईलमध्ये बोनफायर या धार्मिक उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५० लोक जखमी झाले आहेत. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे सांगत दुःख व्यक्त केले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा : कडकडीत लॉकडाऊनची वेळ आलीय

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माउंट मेरन येथे बोनफायर या धार्मिक उत्सवासाठी सुमारे एक लाख लोक एकत्र जमले होते. पण या ठिकाणी आसने तुटून पडल्याने गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. जिथे ही दुर्घटना झाली तेथे प्रार्थनेसाठी लोक एकत्र जमले होते. 

इस्राईलमध्ये कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत. यानंतर बोनफायर या मोठ्या धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

वाचा : मनसुख हत्येत सुनील माने यांचा थेट सहभाग

इस्राईल हा जगातील एकमेव देश आहे ज्याने ८० टक्के लोकांचे कोरोनावरील लसीकरण केले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर इस्राईलने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा नियम मागे घेतला. इथल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत.  

वाचा : सिंगलीला राष्ट्रीय अभयारण्यात दुर्मीळ ‘रेड पांडा’चे दर्शन

Back to top button