Russia Ukraine War : एसी, फ्रिजसह कारच्या वाढणार किमती | पुढारी

Russia Ukraine War : एसी, फ्रिजसह कारच्या वाढणार किमती

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War ) अनेक देशामध्ये महागाई वाढणार असल्याचा इशारा मूडीजने (moodys) दिला आहे. मूडीजचा असा विश्वास आहे की रशिया युक्रेन युद्धामुळे विविध वस्तूंची पुरवठा साखळी विस्कळीत होईल, ज्यामुळे बहुतेक देशांमध्ये चलनवाढ होईल. याचा परिणाम असा होईल की बहुतेक देशांच्या मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतील आणि वाढ कमी करतील. दुसरीकडे युद्धामुळे स्टील, कोळसा, तांबे, अॅल्युमिनियम या धातूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि एसी, रेफ्रिजरेटर्स आणि इतर अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसह कारच्या किमतीत वाढ होईल. गेल्या आठवडाभरात पोलादाच्या किमतीत प्रति टन ५००० रुपयांनी तर कोळशाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

युद्धानंतर (Russia Ukraine War ) तांबे, निकेल, अॅल्युमिनियम यासारख्या धातूंच्या आंतरराष्ट्रीय किमती दररोज वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 110 डॉलरची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. गेल्या दोन आठवड्यात गव्हाच्या दरातही २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरने वाढल्यास भारतातील किरकोळ महागाईचा भडका उडणार आहे.

मूडीजच्या म्हणण्यानुसार, जगातील प्रमुख देशांनाही आपली ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळी व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांच्या धोरणाचा पुनर्विचार करावा लागेल. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होईल आणि हे युद्ध (Russia Ukraine War ) किती काळ चालते यावर अवलंबून आहे, असे मूडीजचे मत आहे. ज्या कंपन्यांचा या युद्धाशी काहीही संबंध नाही त्यांनाही याचा फटका बसू शकतो. कारण दोन्ही व्याजदरात वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine War ), पोलाद निर्मात्यांनी हॉट रोल्ड कॉइल्स (एचआरसी) आणि टीएमटी बारची किंमत प्रति टन 5,000 रुपयांनी वाढवली आहे. युद्ध चालू राहिल्याने त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, कोळशाची किंमत 500 डॉलर प्रति टनपर्यंत पोहोचली आहे, जी गेल्या काही आठवड्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. तांब्याच्या किमतीत वाढ झाल्याने, प्रति टन 10,545 डॉलर, अॅल्युमिनियम 3,710 डॉलर प्रति टन, तर निकेलची किंमत देखील 27,815 डॉलर प्रति टन झाली आहे.

विविध वस्तूंच्या जागतिक उत्पादनात रशियाचा वाटा

तेल: 12 टक्के
नैसर्गिक वायू: 17 टक्के
कोळसा: 5.2 टक्के
तांबे: 4.3 टक्के
अॅल्युमिनियम: 6.1 टक्के
निकेल: 6.1 टक्के
झिंक : ०.५ टक्के
सोने: 9.5%
चांदी: 5.4%
प्लॅटनियम: 14 टक्के

 

Back to top button