No To War : ऑन-एयर शो मध्ये रशियातील टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा | पुढारी

No To War : ऑन-एयर शो मध्ये रशियातील टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

पुढारी ऑनलाईन वृत्तसेवा : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला संपूर्ण जगातच नव्हे तर रशियाच्या टीव्ही चॅनेलकडूनदेखील विरोध केला जात आहे. रशियाच्या बाजूने बातम्या दाखवायला भाग पाडले जात आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याच दरम्यान एका रशियन टीव्ही चॅनेलच्या कर्मचार्‍यांनी लाइव्ह कार्यक्रमात राजीनामा दिला आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचे कव्हरेज रशियाच्या टीव्ही चॅनेलकडून दाखविण्यात येत होते. या सर्व बातम्यांमधून रशियाची सकारात्मक बाजू मांडण्यात येत होती. मात्र या कव्हरेजला रशियाच्या माध्यमांनी विरोध दर्शविला होता. तरीदेखील वारंवार या बातम्या दाखविण्यास भाग पाडल्याने येथील माध्यमांचे अधिकारी संतप्त झाले आहेत.

नो वॅार संदेश देऊन राजीनामा

बातम्यांच्या अंतिम प्रसारणातील “नो वॉर” संदेशानंतर टीव्ही रेन या रशियन टेलिव्हिजन चॅनेलच्या संपूर्ण कर्मचार्‍यांनी थेट प्रसारणाचा राजीनामा दिला. युक्रेन युद्धाच्या कव्हरेजला रशियन अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत सर्व थेट प्रसारण थांबविण्याचा टीव्ही रेनच्या (TV Rain) कर्मचार्‍यांनी निर्णय घेतला.

चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक, नतालिया सिंदेवा, तिच्या शेवटच्या प्रसारणात “नो वॉर” म्हणाली आणि त्यानंतर सर्व कर्मचारी स्टुडिओतून बाहेर पडले. चॅनेलने नंतर एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी ऑपरेशन्स अनिश्चित काळासाठी बंद केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा सामुहिक राजीनाम्याचा व्हिडिओ लेखक डॅनियल अब्राहम यांनी लिंक्डइनवर (Linkedin) शेअर केला आहे.

या सर्व प्रकरणानंतर, चॅनेलने ‘स्वान लेक बॅले’ हा व्हिडिओ प्ले केला. हा व्हिडिओ 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनादरम्यान रशियामधील टीव्ही चॅनेलवर दाखविण्यात आला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रमुख रेडिओ केंद्रांवर बंदी

रशियाच्या प्रसारमाध्यमांच्या कंपन्यांपैकी एक Ekho Moskvi या रेडिओ स्टेशनने देखील युक्रेनमधील युद्धाच्या कव्हरेजवर दबाव आणल्यानंतर प्रसारण बंद केले आहे. त्याच्या संपादकाने गुरुवारी ही माहिती दिली. रेडिओ स्टेशनमध्ये युक्रेनियन पत्रकारांच्या मुलाखती होत्या. ज्यांनी रशियन आक्रमणाची भीषणता सांगितली. यावर संपादक-इन-चीफ ऍलेक्सी वेनेडिक्टोव्ह यांनी या आठवड्यात रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की स्टेशन तीन दशकांपासून त्याचे स्वतंत्र संपादकीय धोरण सोडणार नाही.

रशियन लोक एकमेकांशी आणि बाहेरील जगाशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडियाच वापर असलेल्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरदेखील दबाव टाकण्याचा प्रयत्न रशिया करत आहे, असे देखील यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button