P. T. Usha : गोव्याने दर २ वर्षांनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे: पी. टी. उषा | पुढारी

P. T. Usha : गोव्याने दर २ वर्षांनी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे: पी. टी. उषा

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नीटनेटके नियोजन-आयोजन करणार्‍या गोव्याने दर दोन वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा जागतिक दर्जाची अ‍ॅथलीट व प्रख्यात धावपटू पी. टी. उषा यांनी व्यक्त केली. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहे. तेथे पी.टी. उषा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (P. T. Usha)

त्या म्हणाल्या, गोव्यात आयोजित स्पर्धांमध्ये जवळपास 10 हजार अ‍ॅथलेट्स, 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत. खेळाडूंसाठी ही एक पर्वणी आहे. गोव्याने खूप छान नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करणार आहेत. त्यांनी काही खेळ पाहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे. (P. T. Usha)

त्या पुढे म्हणाल्या, गोव्याने या स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. इथले खेळाडूही जिंकू किंवा मरू, या भावनेने खेळताहेत. अशा स्पर्धा नव्या खेळाडूंना घडवण्यास साहाय्यभूत ठरत असतात. त्यामुळे गोव्याने दर दोन वर्षांनी स्पर्धेचे आयोजन करावे.

‘ऑलिम्पिक’चे यजमानपद भारताने स्वीकारावे
भारताने 2036 ला होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसंदर्भात बोलणी करून यजमानपद भारताकडे घ्यावे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न करावेत.
– पी. टी. उषा

हेही वाचा 

Back to top button