गोवा: क्रीडा स्पर्धेच्या थीम गाण्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज | पुढारी

गोवा: क्रीडा स्पर्धेच्या थीम गाण्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज

पणजी : पुढारी व्रुतसेवा : प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या थीम गाण्याला मिळणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये गोव्यात ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे.

आज (दि.८) शनिवारी गोव्याचे कला व संस्कृती व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी मुंबईत अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. व गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या थीम साँगला त्यांनी आपला आयकॉनिक आवाज द्यावा, अशी विनंती केली. बच्चन यांनी आवाज देण्याचे मान्य केले आहे. एक कलाकार म्हणून त्यांची नम्रता आणि त्यांच्या आदरातिथ्यामुळे आपण भारावलो. हाच त्यांचा स्वभाव त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता बनवतो, अशी प्रतिक्रिया गावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button