गोवा : भाजप नेते कुलदीप बिश्नोई हेच मास्टर माईंड | पुढारी

गोवा : भाजप नेते कुलदीप बिश्नोई हेच मास्टर माईंड

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांनीच सोनाली फोगाट यांची हत्या करवून आणली, असा आरोप सोनालीचे भाऊ रिंकू ढाका यांनी केला आहे. हरियाणा, हिसार येथे झालेल्या सर्व खाप महापंचायतीत रिंकूने हा खुलासा केला आहे. यानंतर कुलदीप बिश्नोई यांनी महापंचायतीसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश खाप पंचायतीने दिला आहे.

रिंकू ढाका यांनी सांगितले की, सोनालीच्या मृत्यूनंतर मी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीला रुग्णालयात पाठवले होते . या हत्येतील आरोपी सुधीर सांगवान याला त्या व्यक्तीला तुला कुलदीपने पाठवले होते का याची चौकशी केली होती. मात्र, यावर सुधीरने काहीच उत्तर दिले नाही.

कुलदीप बिश्नोई खाप पंचायती समोर आले नाहीत त्यांच्या विरोधात विचार करून निर्णय घेण्याचे खाप पंचायतीने ठरविले आहे. याशिवाय एक खाप शिष्टमंडळ फोगाट कुटुंबासह मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. गोवा पोलिसांनी आपला तपास योग्य पद्धतीने- रीतीने केला नसल्याचा आरोप खापचे प्रवक्ते संदीप भारती यांनी केला.  सोनाली फोगट यांची मुलगी यशोधराने सांगितले की, मी अल्पवयीन असल्याने राजकीय वारसा सांभाळण्यास पात्र नाही. त्यामुळे मी हा वारसा माझी मावशी रुकेश पुनिया यांच्याकडे सोपवला आहे. तिच्यावर कोणताही दबाव नाही.

सोनालीने 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. कुलदीपने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तो सोनालीच्या फार्महाऊसवर गेला होता आणि काही दिवसांनी सोनालीचा मृत्यू झाला. सोनालीचे कुटुंबीय तिच्या हत्येचा संबंध आदमपूर पोटनिवडणुकीशी जोडत आहेत.

Back to top button